We are at war and we will win, Israel PM Benjamin Netanyahu after Hamas rocket attack

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Netanyahu On Hamas Rocket Attack : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला (Hamas Rocket Attack) केला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रॉकेट डागण्यात आले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (PM Benjamin Netanyahu) यांनी या हल्ल्याला युद्ध म्हटलं असून जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीतून (Gaza) इस्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रॉकेट डागण्यात आले आहेत. या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी लोकांची संख्या अद्याप स्पष्ट झाली नाही. त्यामुळे आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला जोरदार प्रत्युत्तर देण्याचं जाहीर केलंय. 

गाझा पट्टीतून असंख्य घुसखोरी आणि रॉकेट हल्ल्यांनंतर या हल्ल्याने इस्रायलला ‘युद्ध’ घोषित करण्यास प्रवृत्त केलंय, असं चित्र दिसलं होतं. परिस्थिती चिघळत असताना, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका व्हिडिओच्या (Viral Video) माध्यमातून निवेदन जारी केलं आहे. आपण युद्धात आहोत आणि आपण जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी त्यांनी इस्रायलच्या नागरिकांना युद्धपरिस्थितीबाबत आश्वासित केलं. 

नेमकं काय म्हणाले बेंजामिन नेतन्याहू ?

आम्ही युद्धात आहोत, ऑपरेशन नाही. हमासने इस्रायल राज्य आणि तेथील नागरिकांवर खुनी हल्ला केलाय. घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांच्या वस्त्या साफ करण्याचे आदेश मी सर्वप्रथम दिले आहेत आणि मोठ्या प्रमाणात साठा जमा करण्याचे आदेश दिलेत. शत्रूला अशी किंमत मोजावी लागेल जी त्यांना कधीच माहीत नसेल, असं म्हणत बेंजामिन नेतन्याहू यांनी रणशिंग फुंकलं आहे. 

दरम्यान, हमासचा नेता मोहम्मद डेफ याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हमासने इस्रायल विरोधात युद्ध छेडलं आहे. ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म असं या ऑपरेशनचं नाव आहे. ही मोहीम सुरू करण्यासाठी आम्ही इस्रायलवर पाच हजार रॉकेट डागले आहेत, असं डेफ यांनी सांगितलं. या हल्ल्यानंतर आता इस्राईलचा राग हमासला सहन करावा लागणार आहे.

Related posts