8 October In History Establishment Of Indian Air Force Kashmir Earthquake Dinvishesh Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : 8 ऑक्टोबर 1932 रोजी  इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना करण्यात आली. तर आजच्याच दिवशी काश्मीरमध्ये  ७.६ रिश्टरचा भूकंप झाला. यामध्ये सुमारे 86,000 ते 87,000 हजार लोक मृत्यूमुखी पडले. तर 72,500 जण जखमी झाले आणि 2.8 दशलक्ष लोक बेघर झाले. आजच्याच दिवशी 1962 रोजी  नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला. थॉमस एरिक डंकन – इबोलाचे निदान झालेल्या अमेरिकेमधील पहिल्या व्यक्तीचे निधन झाले. फ्रँकलिन नॅशनल बँक – अमेरिकेतील बँक फसवणूक आणि गैरव्यवस्थापनामुळे कोसळली. अलेक्झांडर सोलझेनित्सिन यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.स्वातंत्र्यवीर सावरकरांचा डी-लिट पदवीने सन्मान करण्यात आला. 

 1932 : भारतीय वायु सेनेची स्थापना

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक आहे. तिच्यावर  भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची आणि भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय वायू सेना दल  हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. भारतीय हवाई दलाच्या ताकदीमुळे आज कोणताही देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करत नाही.  अमेरिका, रशिया आणि चीनक पाठोपाठ भारताचे हवाई दल जगात सर्वात मोठे आहे. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे. याच हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिशांनी रॉयल भारतीय हवाईदल म्हणून केली होती. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते.

1959 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा डी-लिट पदवीने सन्मान

8 ऑक्टोबर 1959 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर  यांना पुणे विद्यापीठाची सन्माननीय डी लिट पदवी देऊन गौरवण्यात आले. 

1970 : अलेक्झांडर सोलझेनित्सिन यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.

अलेक्झांडर इसाविच सोल्शनित्सिन यांचा जन्म 11 डिसेंबर 1918 रोजी झाला.  सोल्शनित्सिन हे 20 व्या शतकातील रशियन भाषेतील महत्त्वाचे लेखक होते. सोल्शनित्सिनने अनेक कादंबऱ्या, कविता आणि लघुकथा लिहिल्या. त्यांना 1970 चे साहित्यातील  नोबेल पारितोषिक मिळाले. 

1978  : केन वॉर्बी  यांनी पाण्यावरील 275.97 नॉट्स वेगाचा जागतिक विक्रम केला

केन वार्बी हे ऑस्ट्रेलियन मोटरबोट रेसर आहे. त्याने 8 ऑक्टोबर 1978 रोजी बेलोज डॅम येथे सेट केलेल्या पाण्याच्या वेगाचा विक्रम केला. 20 नोव्हेंबर 1977 रोजी त्याने 288.60 mph (464.46 km/h) पाण्याच्या वेगाचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आणि ली टेलरचा विक्रम 3 mph (4.8 km/h) पेक्षा थोडा अधिक वेगाने मोडला. त्यानंतर 8 ऑक्टोबर 1978 रोजी 317.6 mph (511.1 km/h) सह  त्याने एक विक्रम प्रस्थापित केला जो आद्याप कोणी मोडलेला नाही. 

1996: वारली आदिवासी उठावाच्या नेत्या गोदावरी परुळेकर यांचे निधन

गोदावरी परुळेकर या स्वातंत्र्यसैनिक, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी आपलं आयुष्य  शेतकरी आणि कामगार वर्गासाठी लढण्यात घालवलं. त्याच विचारसणीचे शामराव परुळेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयामधून पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर कायद्याचा अभ्यास केला. त्या महाराष्ट्रतील पहिली महिला कायदा पदवीधर बनल्या. महाविद्यालयीन काळात गोदावरी यांनी इंग्रजांविरुद्धच्या विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. त्यानंतर त्यांनी आपलं जीवन  ठाण्यातील वारली समुदायाच्या संघर्षासाठी वाहून घेतले. ज्यांना श्रीमंत जमीनदारांकडून जबरदस्तीने आणि बंधनकारक मजुरीत ढकलले जात होते. वारली स्त्रियांवर जमीनदारांकडून बलात्कार केला जात होता, आणि जादूटोण्याचा आरोप करून त्यांची हत्या केली जात होती, अशांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभरला. त्यांनी लिहलेल्या जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकात ही व्यथा मांडली आहे. 

2005 : काश्मीर भूकंप

 8 ऑक्टोबर 2005 रोजी उत्तर पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा प्रांतासह भारताच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंप झाला होता.  भारतीय वेळेनुसार सकाळी  नऊ वाजून 20 मिनिटांनी हा भूकंप झाला होता.  त्याचा केंद्रबिंदू पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद जवळ होता. भारत आणि पाकिस्तानच्या इतर भागांव्यतिरिक्त अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि चीनच्या शिनजियांग प्रांतातही त्याचे धक्के जाणवले. 1935 च्या क्वेटा भूकंपापेक्षा दक्षिण आशियातील हा सर्वात प्राणघातक भूकंप मानला जातो.  या भूकंपात तब्बल  87 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.  

इतर महत्त्वाच्या घडामोडी 

1939 : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला. 
1962 : नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.
1981 : उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. 
2001 : सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.

[ad_2]

Related posts