Ravi Pushya Yoga 2023 : पितृपक्षात अतिशय शुभ असा रवि पुष्य योग! रातोरात वाढेल ‘या’ लोकांचं बँक बॅलन्स

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ravi Pushya Yoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे अत्यंत शुभ मानलं जाते. जेव्हा पुष्य नक्षत्र रविवारी येतं तेव्हा त्याला रवि पुष्य नक्षत्र असं म्हणतात. तर जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरु पुष्य नक्षत्र असं म्हटलं जातं. आज पितृपक्ष दशमी तिथीला दुर्मिळ असा योग जुळून आला आहे. आज दशमी तिथीसोबत रवि पुष्य योग जुळून आला आहे. पितृपक्षात खरेदी केली जात नाही. पण रवि पुष्य नक्षत्रात केलेली खरेदी अधिक शुभ असते असं म्हणतात. म्हणून आज सोनं चांदी, नवीन कार, नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करता येणार आहे. तर रवि पुष्य नक्षत्र काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. (ravi pushya yoga on 8 october 2023 sunday during pitru paksha will increase bank balance of 3 zodiac signs)

रवि पुष्य योग तिथी 

पंचांगानुसार रवि पुष्य योग 8 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 6.24 वाजेपासून 9 ऑक्टोबर 2023 मध्यरात्री 2.25 वाजेपर्यंत असणार आहे.

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी रवि पुष्य नक्षत्र देखील खूप फायदेशीर असणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने या लोकांना धनप्राप्ती होणार आहे. पैशाच्या प्रवाहाचे नवीन मार्ग निर्माण होणार आहे. तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल आणि तो फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी रवि पुष्य नक्षत्र खूप फायदेशीर ठरणार आहे. या लोकांना संपत्ती लाभणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होणार असून ते जलदगतीने पूर्ण होणार आहे. गुंतवणुकीसाठी खूप चांगला काळ असणार आहे. वाहने, मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत. 

तूळ (Libra Zodiac)

रविपुष्य नक्षत्र या राशीसाठीही भाग्यवान ठरणार आहे. या लोकांना अचानक कुठूनतरी पैसा मिळणार आहे. तुमच्या सर्व आर्थिक समस्या संपणार आहे. तुमचे ऋण संपणार आहे. रखडलेली कामं सुरू होणार असून लवकरच पूर्ण होणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि काही महत्त्वाच्या संधी मिळणार आहे. तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Related posts