Mahagenco Recruitment Examination Paper Leak Case Mahanirmiti Administration Appeal And Challenge For Submit Proof Of Paper Leak

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर :  महानिर्मितीमध्ये (Mahanirmiti) झालेल्या पदभरती परीक्षेचा (Mahagenco Recruitment Examination Paper Leak ) पेपर फुटला असल्याचा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता. आता, या दाव्यालाच महानिर्मितीने आव्हान दिले आहे. समितीकडे पुरावे असतील तर पोलीस किंवा महानिर्मितीकडे सुपूर्द करावे, असे आवाहन महानिर्मितीकडून (Mahagenco) करण्यात आले आहे. 

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या पेपरफुटीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. पेपर सुरू असताना प्रश्नपत्रिकाचे बटन कॅमेराने काढलेले फोटो समोर आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री असलेल्या खात्याचा पुन्हा एकदा पेपर फुटला असल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेल्या दाव्यालाच महानिर्मितीने आव्हान दिले आहे. 

महानिर्मितीने पेपरफुटीच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. महानिर्मितीच्या दाव्यानुसार, महानिर्मितीतर्फे 15 एप्रिल 2023 रोजी “कनिष्ठ सुरक्षा अधिकारी” पदाची परीक्षा घेण्यात आली. तर, शारीरिक क्षमता आणि मनोविश्लेषणात्मक क्षमता चाचणी  19 ते 22 जून घेण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्याकरिता हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र इतर उमेदवारांकडून सत्तावन गणेश मंसाराम या उमेदवाराबाबत आक्षेप/तक्रार नोंदविण्यात आले होते.  महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणने राबविलेल्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत इतर उमेदवारांकरिता तोतया उमेदवार म्हणून सत्तावन गणेश मंसाराम  यांच्या विरोधात पवई पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा 2 ऑक्टोबर रोजी दाखल झाला आहे.  ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने याबाबत महानिर्मितीने पवई पोलिस निरीक्षक यांना 3 ऑक्टोबर 2023 ला पत्र पाठवून या संदर्भात अधिक माहिती, कागदपत्रे, न्यायालयीन प्रकरण माहिती आणि संबंधित कागदपत्रे पुरविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे जोपर्यंत या संदर्भात संबंधित व्यक्ती विषयक शहानिशा होत नाही तोपर्यंत सत्तावन गणेश मंसाराम यांचा निकाल महानिर्मितीतर्फे राखून ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले असल्याचे महानिर्मितीने सांगितले आहे.

महानिर्मितीमधील पदभरती परीक्षा ही आय.बी.पी.एस.या नोंदणीकृत संस्थेद्वारे ऑनलाइन घेण्यात आली होती. विशेष म्हणजे, 15 एप्रिल 2023 पासून आजपावेतो महानिर्मितीकडे उपरोक्त ऑनलाइन परिक्षेबाबत कुठल्याही स्वरूपाच्या पेपरफुटीची तक्रार प्राप्त झालेली नाही. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे याबाबत पुरावे असल्यास त्यांनी  महानिर्मितीकडे अथवा पोलिसांकडे रीतसर सादर करावे जेणेकरून योग्य ती कार्यवाही करणे सुकर होईल असे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने काय म्हटले होते?

महानिर्मितीमधील पदभरतीसाठी (Mahagenco Recrutiment Examination) होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत तर मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटला होता. त्यांच्याकडे ऊर्जाचे खाते आहे तर आता महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीचा पेपर फुटला, असा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. फुटलेला पेपर आमच्याकडे आहे असेही समितीने सांगितले. पेपरफुटीबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन दिले होते. मात्र काहीच चौकशी केली नाही. आज आम्हाला पुरावा सापडला आहे. आता तरी या सर्व प्रकरणाची चौकशी करा आणि लवकरात लवकर पेपरफुटीवर कायदा निर्माण करा. नाहीतर देवेंद्र  फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

[ad_2]

Related posts