Maharashtra navnirman sena raj thackeray once again aggressive on toll issue

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा सरकारवर निशाणा साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे आणि मुंबईतील टोलच्या (Toll) वाढीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

जर टोलनाक्यांवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलेल्या वाहनानां टोल आकारला तर ते जाळून टाकू असा इशाराच राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

1 ऑक्टोबरपासून मुंबईतील पाच एंट्री पॉईंटवर टोल आकारणी वाढवल्याच्या निषेधार्थ मनसेचं आंदोलन सुरु आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली या टोलवाढीविरोधात आंदोलन सुरु आहे. अविनाश जाधव यांच्या उपोषणानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी टोलबाबत आश्वासनं दिलेल्या नेत्यांची भाषणे दाखवली.

“2010 ला आम्ही टोलधाडीविरोधात आम्ही आंदोलन सुरु केलं. आमच्या आंदोलनानंतर अधिकृत आणि अनधिकृत असे 67 टोल नाके बंद झाले. आणि ते टोलनाके आमच्या रेट्यामुळेच झाले. कुठल्याच सरकारच्या मनात टोल बंद करायची इच्छा नव्हती पण आमचा रेटा इतका होता की टोल बंद करावेच लागले. उद्धव ठाकरे ते देवेंद्र फडणवीस ते अजित पवार सगळ्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू अशी आश्वासनं दिली. पण तरीही टोल बंद होत नाही कारण ह्यात प्रत्येकाचं अर्थकारण सामील आहे. त्यामुळे रस्ते कितीही खराब असले तरीही हे सगळे राजकीय पक्ष कधीच टोल बंद होऊ देणार नाहीत. पण ह्यावर लोकं कधी यावर जागृत होणार?,” असा सवाल राज ठाकरेंनी केला.


हेही वाचा

[ad_2]

Related posts