Brahmin Community Will Take To The Streets In Chhatrapati Sambhajinagar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जालना: मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता आपल्या मागण्यांसाठी ब्राह्मण संघटना देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे उद्या ब्राह्मण संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी सर्व ब्राह्मण संघटना एकत्रित आल्या आहेत. ब्रह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, तसेच समाजातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण मोफत करावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे. 

आपल्या मागण्यांसाठी ब्राम्हण संघटना एकटवल्या असून, उद्या सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगरातील वंदे मातरम सभागृहापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. सरकारने आपल्या मागण्या गंभीर्याने घेतल्या नाही तर येणाऱ्या काळात त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील संघटनांच्या वतीने देण्यात आलाय.

ब्राह्मण समाजाच्या मागण्या…

  • ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे.
  • ब्राह्मण समाजातील आर्थीक मागास घटकातील तरुणांना व्यवसायीक मदतीसाठी परशुराम आर्थीक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी एक हजार कोटीची तरतुद करण्यात यावी.
  • ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारावे, स्थापन करण्यात यावे. व प्रत्येक जिल्ह्याला परशुराम भवन देण्यात यावे.
  • ब्राह्मण पुरोहितांना मासिक 5 हजार मानधन देवुन त्यांची विविध मंदीरात नियुक्ती करावी ज्याद्वारे प्रत्येक मंदिरात नित्यपुजा लावली जावी.
  • ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनामी जमीन वर्ग-2 मधुन वर्ग- 1संवर्गात बदल करण्यात याव्यात त्याचा मालकी हक्क कायम करण्यात यावा.
  • ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करुन सामाजिक विडंबनातून मुक्ता करण्यात यावी.
  • परंपरागत राज्यातील मंदीरे ज्यात्या पुर्ववत वंशपरंपरागत व्यवस्थापनाकडे हस्तांतरीत करण्यात यावी जेणे करुन मंदीराचे पावित्र्य व व्यवस्थापन सुस्थीतीत अबाधीत राहील.
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांना “भाररत्न” पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात यावे.
  • ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थीक व शैक्षणीक पातळीवर झालेल्या बदलाचा चांगला वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची, आयोगाची शासनस्तरावर नेमणुक करण्यात यावी.

[ad_2]

Related posts