( प्रगत भारत । pragatbharat.com)
Trending Video : सोशल मीडियावर सेकंद सेकंदाला व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्मवर खरं तर मनोरंजनक व्हिडीओ खजिना पाहिला मिळतो. पण याच सोशल मीडियाचा वापर समाजातील अनेक महत्त्वाचे प्रश्न ज्यांच्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वापर केला जातो. सोशल मीडियावर कधी कधी असे धक्कादायक किंवा संतापजनक व्हिडीओ पाहिला मिळतात की मन विचलित होतं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये एका सूनेने आपल्या वृद्ध आणि आजारी सासऱ्यांना पंलगावर जाळण्याचा प्रयत्न केला. सूनेचं हे संतापजन कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला. त्यानंतर आता अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. (police officer in front of women in a vest towel hearing complaint up video viral trending news now)
पोलीस अधिकाऱ्याचं कृत्य…
प्रत्येक देशात शांतता राखण्यासाठी कायदा आणि सुवस्था सांभाळण्यासाठी भक्कम अशी पोलीस व्यवस्था असते. समाजात शांतता राखणं, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना अटक करणं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हे काम पोलीस कर्मचारी करत असतात. मात्र काही पोलीस कर्मचारीच्या कृत्यामुळे पोलिसांवरील विश्वास डगमगतो. अशाच एका पोलिसांनी बनियान – टॉवेलमध्येच महिलांसमोर जे काही केलं त्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.
जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महिला आपली तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आल्या आहेत. मात्र हे इन्स्पेक्टर साहेब बनियान आणि टॉवेलवर बसलेले दिसून येतं आहे. इन्स्पेक्टरला अशा अवस्थेत पाहून महिला अस्वस्थ होतात. पण या पोलीस कर्मचारीला कुठलीही लाज वाटली नाही. तर महिलांसमोर असं कृत्य हे आक्षेपार्ह आहे, याचं ही त्याला विसर पडलेला दिसत होता.
कुठली आहे ही घटना?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा उत्तर प्रदेशातील कौशांबीमधील आहे. तर हे धक्कादायक कृत्य कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंघिया चौकीतील आहे. बालकामाऊ गावातील वादविरोधात त्या महिला तक्रार करण्यासाठी पोलीस चौकीत आल्या होता. महिलांची तक्रार ऐकण्यासाठी चौकीचे प्रभारी राम नारायण सिंह बनियान आणि टॉवेल गुंडाळून आले होते.
कौशाम्बी
वर्दी टोपी उतार कर पीछे अलमारी में रख करते है जनसुनवाई।
अर्ध नग्न अवस्था में जनसुनवाई का वीडियो शोशल मीडिया हुआ वायरल।
राम नारायण चौकी इंचार्ज सिंधिया भरवारी थाना कोखराज बताया जा रहा है।@kaushambipolice @ADGZonPrayagraj @Uppolice pic.twitter.com/gn2yqLVeYN— arun Mishra (@ArunMis38185315) November 6, 2023
पोलीस साहेबावर कारवाई
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर X वरील arun Mishra या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राम रायण सिंह यांच्यावर कारवाई करण्यात आली. या चौकीच्या प्रभारीपदाची जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली.