[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळी आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या रचनात्मक कार्यामध्ये कृतिशील योगदान देणारे ज्येष्ठ लेखक, संपादक डॉ.मिलिंद बोकील यांना यंदाच्या अनंत भालेराव स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 50 हजार रुपये असे स्वरूप असलेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना येत्या 29 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) होणार्या विशेष कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे. याबाबत अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता पानट यांनी माहिती दिली आहे.
[ad_2]