Baramati Crime News An Egg Bhurji Seller Was Killed For Not Giving Free Eggs An Incident In Baramati

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बारामती, पुणे : फुकट अंडी न दिल्याच्या (Baramati News) कारणावरून अंडा भुर्जी विक्रेत्याचा मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला आहे. 30 सप्टेंबरला बारामती शहरातील टी सी कॉलेज रस्त्यावर शाहबाज रौफ पठाण हा रात्रीच्या वेळी अंडा भुर्जी गाडी लावून विक्री करीत होता. त्यावेळी अंडाभुर्जी विक्रेत्याला अज्ञात व्यक्तीने गंभीर जखमी केले होते. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

जखमींवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना रविवारी त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी अधिक तपास केला असता शहाबाज पठाण याला दारूच्या नशेत फुकट अंडी देण्याबाबत एकाने वाद घातल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे माहिती काढून प्रवीण भानुदास मोरे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. त्याने कबुली दिल्याने बारामती शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
 
व्यावसायिक तसेच इतर लोकांना विनाकारण त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांबाबत माहिती असल्यास तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा किंवा 112 या आपत्कालीन नंबरवर माहिती द्यावी असे  बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी आवाहन केले. बारामती शहर सध्या गुन्हेगारीच्या विळख्यात सापडल्याचं दिसून येत आहे. क्षृल्लक कारणावरुन मोठे वाद, मारहाण आणि थेट हत्या केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा वचन उरला नाही आहे का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. 

बारामतीत नेमकं चाललंय काय?

पत्नीने पतीला जीवे मारण्याच्या उद्देशाने उकळते (Baramati News) पाणी अंगावर टाकल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडली होती. यात जखमी पती 40 टक्के भाजला गेला. बारामती तालुक्यातील पारवडीत ही धक्कादायक घटना घडली होती. सागर कुंभार असं जखमी तरुणाचे नाव होतं. कौटुंबिक वादातून सागर कुंभार घरी झोपलेले असताना पत्नी कविता कुंभारने सागरच्या अंगावर आणि तोंडावर उकळते गरम पाणी टाकले होते. तेच पाणी छातीवर, पोटावर, गुप्तांग आणि पाठीमागील गुदद्वाराजवळील भागावर पडले. त्यात सागर कुंभार याची कातडी 40 टक्के भाजली होती. पाणी टाकल्यानंतर पत्नीने पडलेल्या लोखंडी पाईपने पतीच्या डोक्यात आणि पाठीवर मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्नदेखील केला. तसेच त्यानंतर तसेच तुला आता जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. यावरून सागर कुंभार यांनी फिर्याद दिल्यानंतर पत्नीवर बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts