( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shani Nakshatra Parivartan 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. त्याचप्रमाणे काही ग्रह नक्षत्र परिवर्तन देखील करतात. शनी देव काही काळानंतर राशी बदलांसह नक्षत्र बदलतो. शनी शतभिषा नक्षत्र सोडून 15 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.49 वाजता धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करत आहे. यावेळी शनीदेव 24 नोव्हेंबरपर्यंत या नक्षत्रात राहणार आहेत.
धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. शनि आणि मंगळ सुसंगत आहेत. पण दोघांमध्ये वैराची भावना आहे. अशा स्थितीत धनिष्ठ नक्षत्रात शनीचा प्रवेश अनेक राशींसाठी सकारात्मक आहे तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊया, शनि जेव्हा धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल.
कर्क रास (Kark Zodiac)
कर्क राशीच्या लोकांना धनिष्ठ नक्षत्रात शनीच्या प्रवेशामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या राशीच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. कामात अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका. आर्थिक परिस्थिती : कोणताही निर्णय घेण्यापूर्वी थोडी काळजी घ्या. कुटुंबासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो.
कन्या रास (Kanya Zodiac)
शनीच्या राशीतील बदलामुळे कन्या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. या काळात तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत कौटुंबिक त्रासामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात कोणत्या मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात
मीन रास (Meen Zodiac)
मीन राशीच्या लोकांनी सावध राहणं आवश्यक आहे. पैशाच्या व्यवहाराबद्दल प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या करिअरबद्दल थोडे चिंतेत असाल. व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. लव्ह लाईफवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )