Pune Municipal Corporation Involve Villages Appointed 28 Officers Including Deputy Commissioner

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  पुण्यातील 23 गावांमध्ये नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी (Pune PMC) प्रशासनातर्फे 4 उपायुक्त, 8 सहाय्यक आयुक्त आणि 16 संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी संदर्भात परिपत्रक काढून  माहिती दिली आहे. 

विशेष म्हणजे उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे 12  गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेने जुलै 2021 मध्ये हद्दीलगतची 23 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करताना गावाची हद्द आणि लोकसंख्या लक्षात घेत 23 गावांच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. 

म्हाळुंगे, सुस, बावधन- बुद्रुक., किरकीटवाडी, पिसोळी, कोंढवे- धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी-बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे- हांडेवादी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली अशा 23  तत्कालीन ग्रामपंचायतीच्या हद्दीतील क्षेत्र पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ठ करण्यात आले आहे. 

या सगळ्या गावांच्या अनेक समस्या आहे. पाणी, कचरा आणि काही विकासाच्या समस्या आहेत. गावातील नागरिकांनी गावं महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर अनेक समस्या असल्याचं अनेकदा बोलून दाखवलं आहे. त्यांनी पाण्यासाठी किंवा इतर सोयींसाठी आंदोलनंदेखील केली. महापालिकेत समाविष्ठ झाल्यानंतर हद्दीवरुनदेखील अनेक प्रश्न निर्माण झाले होते. 

त्यासोबतच पावसाळ्यात या गावात मोठ्या समस्या निर्माण  झाल्या होत्या . गावागावात पाणी व्यवस्था, रस्ते आणि सांडपाण्याचं नियोजन यासंदर्भात समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. संदर्भात विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली आहेत. विधिमंडळ अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. गावांमधील पायाभूत समस्या किंवा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती तयार करण्यात येणार होती. त्यासंदर्भात शासनाकडे प्रस्तावही पाठवण्यात आला होता. मात्र या प्रस्तावाला अजूनही मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे आयुक्तांनी हे पाऊल उचललं आहे. गावांमध्ये योग्य सुविधा पुरविण्यासाठी आणि नागरिकांच्या इतर समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे

उपायुक्त आणि 23 गावांची जबाबदारी

  • किशोरी शिंदे – वाघोली
  • संतोष वारुळे – म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रूक
  • आशा राऊत – कोपरे, कोंढवे-धावडे, सणसनगर, नांदोशी, नऱ्हे, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी
  • प्रसाद काटकर – औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रूक, गुजर-निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी

गावातील नागरिकांचे प्रश्न सुटणार?

महापालिकेच्या या निर्णयामुळे गावातील नागरिकांचे प्रश्न सुटणार असल्याचं बोललं जात आहे. प्रत्येक गावावर उपायुक्तांचं विशेष लक्ष असणार आहे आणि जबाबदाऱ्या वाटप केल्यानंतर गावातील समस्या सुटण्याची अपेक्षा आहे. 

इतर महत्वाची बातमी-

 

तुळजाभवानी दर्शन मंडपावरून वाद पेटला; आज तुळजापूर बंदची हाक; पाहा काय आहे नेमकं प्रकरण?

 

[ad_2]

Related posts