[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Inflation Impact: देशात वाढलेल्या महागाईचा (inflation) सर्वांनाच फटका बसत आहे. या वाढत्या महागाईनं कर्मचारी देखील हैराण झाले आहेत. वाढत्या महागाईमुळं कर्मचाऱ्यांना घर चालवणं कठीण होत आहे. अनेकांना नोकरी करावी असं वाटत नाही. एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्येक चारपैकी एका कर्मचाऱ्याला काम करावेसे वाट नसल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.
26 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी करावी असं वाटत नाही
महागाईमुळे लोकांना नोकरी सोडावी लागत आहे. कारण कर्मचारी ज्या पगारावर काम करत आहेत, त्या पगारात घर चालणे कठीण झालं आहे. PWC च्या अहवालानुसार, जगातील प्रत्येक चार कर्मचार्यांपैकी एका कर्मचाऱ्याला म्हणजे 26 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी करावी असं वाटत नाही. नोकरी सोडून उदरनिर्वाहासाठी दुसरे काही काम करावे असे वाटत आहे.
जगभरातील 53 हजार 912 कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण
PWC ने जगभरातील 53 हजार 912 कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. अहवालानुसार, कर्मचार्यांचा असा विश्वास आहे की, ते काम करत असलेल्या पगारातून घरखर्च भागवणं खूप कठीण होत आहे. ते ईएमआय देखील भरण्यास सक्षम नाहीत. या कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आयुष्यभर कष्टाचे पैसे खर्च करावे लागतात. यामुळेच लोक पुढच्या नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत. या कर्मचाऱ्यांना काम करण्याऐवजी आता स्वत:चे काही काम सुरु करायचे आहे.
बहुतांश कर्मचाऱ्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याकडे कल
अहवालानुसार, ब्रिटनमधील 47 टक्के कर्मचार्यांचे म्हणणे आहे की, महिन्याच्या शेवटी त्यांचा संपूर्ण पगार खर्च होतो. त्यांच्याकडे बचत करण्यासाठी काहीच उरले नाही. 15 टक्के कर्मचार्यांचा असा विश्वास आहे की, ते काम करत असलेल्या पगारासह घरातील सर्व बिले अदा करु शकत नाहीत. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक आपली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय किंवा काम करण्यावर अधिक भर देत आहेत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आर्थिक अनिश्चिततेचा काळ आहे. या काळात कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची इच्छा असतानाही ते नोकरी सोडू शकत नाहीत. 2008 मध्ये आलेल्या आर्थिक संकटामुळं 26 लाख लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या होत्या. देशात अनेक कर्मचारी कमी पगारावर काम करत आहेत. त्यांना मिळालेल्या पगारात घर चालणे कठीण झालं आहे. त्यामुळं त्यांनी नोकरी करावी असं वाटत नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
CNG PNG Price : महागाई तुमचा खिसा रिकामा करणार! सीएनजी-पीएनजी महाग होण्याची शक्यता
[ad_2]