[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज टोलसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय. मुंबईकर रोड टॅक्स भरत असताना, त्यांच्याकडून टोल वसूल का केला जातो? असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केलाय. या बैठकीत, एमएच-४ वरील टोलनाके बंद करण्याबाबत विचार सुरू असून, त्याबाबत समिती स्थापण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय. दरम्यान, उद्या सकाळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मंत्री दादा भुसे, राधेश्याम मोपलवार तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीचे अधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. यातली महत्त्वाची गोष्ट अशी की, मंत्री, शासकीय यंत्रणा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक घेत असल्यामुळे, सरकारला नेमकं काय सूचित करायचंय, असा प्रश्न विचारला जातोय.</p>
[ad_2]