Alleged Mastermind In Manipur Teens Murder Arrested From Pune By CBI

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : मणिपूर (Manipur Violence) मागील काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. यात दोन मुलांचं अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. याच मास्टरमाईंडचं आता पुणे कनेक्शन पुढे आलं आहे. मणिपूरमधील दोन तरुणांचे अपहरण करत हत्या केल्या प्रकरणी CBI कडून ‘मास्टरमाइंड’ ला अटक केली. पुणे येथे येऊन त्या व्यक्तीला सीबीआयने अटक केली. पाओलुनमांग असं अटक करण्यात आलेल्या 22 वर्षीय आरोपीचं नाव आहे. अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 16 ऑक्टोबरपर्यंत सीबीआयची कोठडी दिली. 

मणिपूरमधील हिंसाचाराची आपल्यातील अनेकांना माहिती आहे. याच वेळी दोन मुलांचं अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे देशभरातून संतापाची लाट उसळली होती. हे सगळं प्रकरण घडल्यानंतर या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला. आता सीबीआय या प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ पर्यंत पोहचले आणि त्यांनी पुण्यातून या ‘मास्टरमाइंड’ला बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणातील आरोपींनी मणिपूरमधील 17 वर्षीय विद्यार्थी हिजाम लिनथोइंगंबी आणि 20 वर्षांचा फिजाम हेमजीत यांचे अपहरण केले होते. या प्रकरणी सीबीआयने तपास सुरु केल्यानंतर चार आरोपींना अटक केली होती. पाओमिनलुन हाओकिप, एस. मालस्वान हाओकिप आणि दोन महिला लिंग्नेइचोन बैतेकुकी आणि टिननेइलिंग हेन्थांग यांना एक ऑक्टोंबर रोजी अटक केली होती. परंतु मास्टरमाइंड फरार होता.आता या सीबीआयने ‘मास्टरमाइंड’लादेखील गजाआड केलं आहे. 

या दोन बेपत्ता मुलांच्या मृत्यूनंतर मणिपूरमध्ये चार दिवस निदर्शने सुरू होती. संतप्त जमावाने इंफाळ येथील मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या खाजगी घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी जमावाला घराच्या 500 मीटर आधी अडवलं होतं. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. त्यानंतर  मुख्यमंत्र्यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

 मणिपूर हिंसाचारामागे दहशतवादी संघटनांचा हात? 

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये (Manipur Violence) चार महिन्यांनंतरही अशांत आहे. त्यातच मणिपूरमधील या हिंसाचाराबाबत एनआयएच्या (NIA) तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार भडकवण्यामागे म्यानमारमधील काही प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं एनआयएच्या तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणी एका संशयीत व्यक्तीला एनआयएने अटक केली आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारामागे दहशतवादी संघटनांचा हात? एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

[ad_2]

Related posts