India Vs Pakistan Live Update Arijit Singh Sunidhi Chauhan Shankar Mahadevan And Sukhwinder Singh Performance At The Narendra Modi Stadium

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India Vs Pakistan Live Update : वर्ल्ड कप इतिहास नव्हे, तर क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक रोमांचक आणि सर्वाधिक उत्कंठावर्धकराहणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर दणक्यात सुरुवात झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

भारताची बाजू आणखी दमदार झाली असून सलामीवीर शुभमन गिल संघामध्ये परतला आहे. त्यामुळे त्याची आज पाकिस्तानविरुद्ध दणक्यात वर्ल्डकप एन्ट्री झाली आहे. त्यामुळे भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे या सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वी बाॅलिवुडमधील गायकांनी चार चाँद लावले. गायक अरजित सिंग, शंकर महादेवन, सुनिधी चौहान, सुखविंदर सिंग यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर परफॉर्मन्स करत लाखोंच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या चाहत्यांना प्रफुल्लित करून टाकले. त्यामुळे एक वेगळ्या वातावरणामध्ये सामन्याची सुरुवात झाली.  कलाकारांनी दाखवलेल्या संगीतमय नजराणामुळे चाहत्यांना मेजवानी मिळाली. 

क्रिकेटचा देव वर्ल्डकपसह मैदानात

दुसरीकडे, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सुद्धा वर्ल्डकप ट्रॉफीसह मैदानात उतरल्याने एक वेगळाच माहोल मैदानामध्ये तयार झाला. सचि तेंडुलकरच्या एंट्रीने चाहत्यांनी एकच जल्लोष केला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर जवळपास एक लाख तीस हजार प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी उपस्थिती लावली आहे. मैदान भरण्यासाठी सकाळपासून सुरुवात झाली होती. रस्त्यांवर गर्दीच गर्दी दिसून येत होती. 

दुसरीकडे, रोहित सेना हा विक्रम 8-0 ने करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल यात शंका नाही. विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि रोहित शर्मा यांसारख्या नायकांनी भरलेल्या संघाकडून चाहत्यांना कोणत्याही किंमतीत विजय हवा आहे. दुसरीकडे, अलीकडेच आशिया कपमध्ये पाकिस्तानचा भारताकडून एकतर्फी पराभव झाला. पाकिस्तानने अलीकडेच एका उच्च धावसंख्येच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता, तर रोहित शर्माचा संघ अफगाणिस्तानला एकतर्फी सामन्यात पराभूत करून अहमदाबादला पोहोचला आहे. एक लाखाहून अधिक चाहते स्टेडियममध्ये असतील आणि सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या कामगिरीवर असतील.



[ad_2]

Related posts