India Vs Pakistan Live From Narendra Modi Stadium Ahmedabad Fans Gathered Watch Video

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India Vs Pakistan: आशिया कप 2023 नंतर आता पुन्हा भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) विश्वचषक 2023 (World Cup 2023) दरम्यान आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघाचा हा महामुकाबला 14 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. याआधी टीम इंडियाने टॉस जिंकल्याने पुढील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आशिया कपमधील झालेला पराभव विसरुन पाकिस्तान संघ जिंकण्याच्या उद्देशाने पुन्हा मैदानात उतरला आहे. भारताचंही लक्ष्य पाकिस्तानला हरवून हा सामना जिंकण्याचं आहे.

स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी

विश्वचषकादरम्यान दोन्ही संघ एकूण सात वेळा एकमेकांसमोर आले आहेत, पण यातील एकही सामना पाकिस्तानने जिंकला नाही. आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघांसह त्यांचे चाहते देखील सज्ज झाले आहेत. सामन्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात लाखो चाहते नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर जमल्याचं दिसत आहे.

सचिनचा विक्रम मोडण्याची विराटकडे अखेरची संधी

सकाळपासूनच चाहत्यांनी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलं आहे. आजच्या सामन्यात कोण लक्षवेधी कामगिरी करणार, याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. पण या सामन्यात सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडण्याची संधी विराट कोहलीकडे (Virat Kohli) आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरोधात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडण्याची संधी विराट कोहलीकडे आहे. कदाचित ही अखेरची संधी विराट कोहलीकडे असेल. 

विराट कोहली सध्या 34 वर्षांचा आहे. त्यामुळे पुढील विश्वचषकात खेळण्याची शक्यता आताच सांगता येत नाही. त्याशिवाय पुढील विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार की नाही, हेही अद्याप सांगता येणार नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची विराट कोहलीकडे ही अखेरची संधी असेल. विश्वचषकात पाकिस्तानविरोधात सर्वाधिक धावा चोपण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरोधात आतापर्यंत पाच सामन्यात 313 धावा चोपल्या आहेत. 1992 ते 2011 या दरम्यान पाच विश्वचषकात 78 च्या जबरदस्त सरासरीने सचिन तेंडुलकरने 313 धावा चोपल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 98 राहिली आहे. विराट कोहलीला हा विक्रम मोडण्यासाठी 120 धावांची गरज आहे. 

हेही वाचा:

IND vs PAK: जीतेगा भाई जीतेगा… भर रस्त्यात पाकिस्तानी चाचांचा नारा; पण भारतीय चाहत्यांच्या चातुर्यापुढे चाचाही हरले, पाहा मजेशीर व्हिडीओ



[ad_2]

Related posts