Maharashtra Politics CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray For Samajwadi Party Yuti Said They Will Do This With Everyone Detail Marathi News | Eknath Shinde : ‘ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील’, ठाकरे गट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गट (Thackeray Group) आणि समाजवादी पक्षाच्या युतीवर टीकास्त्र सोडलं. अनेक दशकांच्या दुराव्यानंतर पुन्हा शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी समाजवादी जनता पक्षासोबत संवाद साधला. रविवार (15 ऑक्टोबर) रोजी मुंबईतील एम.आय.जी. क्लबमध्ये ठाकरे गट आणि समाजवादी पक्ष यांची संयु्क्त बैठक पार पडली. याच बैठकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी संवाद साधलताना टीकास्त्र सोडलं. 

त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली – मुख्यमंत्री शिंदे

‘जेव्हा त्यांनी काँग्रेससोबत युती केली तेव्हाच त्यांचं हिंदुत्व कळालं. त्यांनी त्याचवेळी बाळासाहेबांच्या विचारांना देखील तिलाजंली दिली. महाराष्ट्रातील जनेतची देखील त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या हिंदुत्वाविषयी बोलू नये. ज्यांना ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील,’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

खेळ आणि राजकारण एकत्र आणू नये

ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करु शकता मग आम्ही समाजवादी पक्षासोबत आलो तर अडचण काय? असा सवाल उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावर बोलतना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, ‘त्यांनी खेळ आणि राजकारण याची गल्लत करु नये. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.’ 

घरी बसलेल्यांना कोणाही मतदान करत नाही

उद्धव ठाकरे यांनी भाजपने लोकांचा भ्रमनिरास केला असल्याचं वक्तव्य त्यांच्या भाषणादरम्यान केलं. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं की, ‘येणाऱ्या निवडणुकीत मतदार दाखवून देतील. मतदार सुज्ञ आहेत. घरात बसलेल्यांना कोणीही मतदान करत नाही. मागील नऊ वर्षांमध्ये ज्यांनी विकास केला आहे आणि जो विकास केलाय त्याला लोक मत देतील.’ 

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तर यावेळी त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणादरम्यान आम्ही समाजवादी पक्षासोबत युती केली तर काय बिघडलं असा सवाल उपस्थित केला, तर यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही असं म्हणत उत्तर दिलं. 

हेही वाचा : 

Uddhav Thackeray : ‘सत्ता नसताना जे बरोबर येतात तेच चिरकाल टिकतात’, संयुक्त बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

[ad_2]

Related posts