[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्यातल्या काही लोकांनी वेगळा मार्ग निवडला. ‘त्यांनी आपला अध्यक्षही निवडला’, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला. तर भारत पाकिस्तानच्या सामन्यामध्ये मुंबईच्या खेळाडूंनी योगदान दिलं असल्याचं म्हणत शरद पवारांनी खेळाडूंचे देखील कौतुक केलं.
‘सामन्य माणूस निकाल तुमच्या बाजूने देईल’
‘सध्या निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर लढाई सुरु आहे. पण जर त्यांनी सामान्य माणसाच्या मनातला निकाल वाचला तर तो निकाल तुमच्या बाजूने लागेल. सध्या निवडणूक आयोगात खऱ्या राष्ट्रवादीवक संघर्ष करण्याची वेळ आली आहे. पण आपण आपली लढाई लढणार आहोत आणि जिंकणार आहोत’, असा विश्वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.
मुलांचं भविष्य धोक्यात – शरद पवार
‘नाशिकमधील शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला. शाळेमध्ये जर मुलांच्या समोर तुम्ही अशा गोष्टी सादर करत असाल तर हे कसलं सरकार आहे’, असा सवाल यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला. ‘हे सरकार मुलांचं भविष्य धोक्यात घालतंय. या सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या मुलांनी शिकायचं कसं’, असा सवाल शरद पवार यांनी सरकारला विचारला आहे.
हे सरकार बदलायला हवं – शरद पवार
‘19,553 मुली बेपत्ता झाल्याची माहिती माजी गृहमंत्र्यांनी बैठकीत दिली. ऐवढ्या महिला आणि मुली गायब आहेत, त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल. त्यामुळे राज्यातील महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे. हे सरकार त्यांच्यासाठी काहीच करत नाहीये’, त्यामुळे हे सरकार बदलण्याची भूमिका आता आपल्याला घेणं गरजेचं असल्याचं शरद पवारांनी यावेळी म्हटलं.
‘तुम्ही प्रत्येक राज्याच्या स्थितीचा आढावा घ्या’
‘सध्या भाजप कुठे आहे हाच प्रश्न आहे. तुम्ही संपूर्ण भाराताचा नकाशा घ्या आणि पाहा. संपूर्ण दक्षिण भारतातून भाजप गेलं आहे. गोव्यात त्यांना आमदार फोडले म्हणून त्यांची सत्ता आली. महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, ते पाडून सत्ता आणली. गुजरातमध्ये त्यांची सत्ता आहे. पण राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली इथे कुठेच भाजप नाही. काही मोजक्या राज्यात भाजप आहे. बाकी संपूर्ण देशात भाजप कुठेच नाही’, असं शरद पवारांनी म्हटलं.
कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करणं चुकीचं – शरद पवार
‘कंत्राटी पद्धतीने नोकरी देणं म्हणजे त्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसाला नोकरीची खात्री नाही. जेव्हा एखादा माणूस नोकरी करण्याचा विचार करतो तो आयुष्यभरासाठी. पण फक्त अकरा महिन्यांसाठी त्याला कामावर घेणं हे किती योग्य आहे, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. कंत्राटी पद्धातीने नोकर भरती हा प्रकार मी कधीच महाराष्ट्रात पाहिला नाही. मी सुद्धा गृहमंत्री होतो, मुख्यमंत्री होतो. त्यामुळे अकरा महिन्यांनंतर त्यांनी काय करायचं. कंत्राटी पद्धतीवर नोकर भरती करण्याचं वाईट काम या देशात अजूनही कोणी केलं नाही’, पण हे भाजपचं सरकार महाराष्ट्रात करत आहे, असं म्हणत शरद पवार यांनी कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या भरती प्रक्रियेवर निशाणा साधला.
हेही वाचा :
Eknath Shinde : ‘ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील’, ठाकरे गट – समाजवादी पक्षाच्या युतीवर मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात
[ad_2]