( प्रगत भारत । pragatbharat.com)
Smallest Baby: जगाच्या कानाकोपऱ्यात दररोजा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. या घडलेल्या गोष्टी पाहून कधी आश्चर्य, कौतुक तर कधी वाईटही वाटते.ब्रिटनमधील वेल्समध्ये वेगळी घटना समोर आली. ज्याकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. येथे एका मुलीचा जन्म घेतला असून विशेष म्हणजे तिचे जन्मावेळचे वजन केवळ 328 ग्रॅम आहे. 9 महिन्यांनी डिलीव्हरी होणे अपेक्षित या मुलीचा जन्म नियोजित वेळेच्या पाच महिने अगोदर झाला.. मुलीच्या आईला गरोदरपणात खूपच त्रास झाला. हा त्रास इतका गंभीर होता की महिला हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तिने लगेच नवजात बाळाला जन्म दिला. ही मुलगी वेल्समध्ये जन्मलेली सर्वात लहान बाळ म्हणून ओळखू लागली आहे. रॉबिन चेंबर्स असे या चिमुकलीचे नाव असून तिच्या आईचे नाव चँटेल चेंबर्स आणि वडिलांचे नाव डॅनियल चेंबर्स आहे. या मुलीला पाहण्यासाठी दूरुन लोक येत आहेत. तिची विचारपूस करत आहेत.
रॉबिनचा जन्म होताना ती खूप लहान असेल, असे आम्हाला माहिती होते, पण ती इतकी लहान असेल हे कळाल्यावर आश्चर्याचा धक्का बसल्याचे तिचे आई वडिल सांगतात. आमची मुलगी इतकी लहान होती की तिला हॉस्पिटलमध्ये आयुष्य काढावे लागेल हे आम्हाला माहीत नव्हते, असे ते सांगतात.
ग्रॅंज हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या रॉबिनला अॅन्युरिन बेव्हन युनिव्हर्सिटी हेल्थ बोर्डाने वेल्समध्ये जन्मलेल्या सर्वात लहान बाळाची पदवी प्रदान केली आहे. तिचे वजन 328 ग्रॅम आहे. रॉबिन इतकी लहान आहे की आपल्या आईच्या तळहातात ती बसू शकते, असे सांगण्यात येते. डेली मिररने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या रुग्णालयात जन्मलेली सर्वात लहान मुलगी असल्याचे तिच्या जन्मानंतर डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टर, नर्सेसची संपूर्ण टिम रॉबिनवर देखरेख ठेवून तिची काळडी घेत होती. रॉबिन आता वेल्समध्ये जन्मलेली सर्वात लहान मूल देखील बनली आहे. रॉबिनचा जन्म अवघ्या 23 आठवड्यात झाला. गर्भधारणेच्या 22 आठवड्यांनंतर तिच्या आईला पोटात वेदना होऊ लागल्या.रॉबिन कदाचित जगणार नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले होते. पण सुदैवाने तसे झाले नाही आणि रॉबिनने हे जगात पाऊल टाकले.
रॉबिनचा जन्म झाल्यावर ती खूपच लहान असल्याने तिला ताबडतोब व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. चिमुकली इतकी लहान होती की तिच्या शिरा शोधण्यासाठी डॉक्टरांना खूप वेळ लागला. सुरुवातीला रॉबिनचे वजन वाढविणे हे डॉक्टरांसमोरचे मोठे आव्हान होते. पण डॉक्टरांच्या संपूर्ण टिमने हे आव्हान स्वीकारले आणि हळूहळू रॉबिनचे वजन वाढू लागले. आता रॉबिन तीन महिन्यांची असून तिचे वजन 1 किलोग्रॅम आहे. असे असले तरी जुलैमध्ये तिचा जन्म झाल्यापासून तिने अजून आपले घर पाहिले नाही. वजन वाढण्यासाठी तिला रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे.