[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सोलापूर : मुंबईच्या गुन्हे शाखेकडून सोलापुरात एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसीतील एका बंद पडलेल्या कंपनीतून ड्रग्सचा गोरख धंदा चालत होता. तर, गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कंपनीत ड्रग्स निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मुंबईच्या गुन्हे शाखेचे पथकाकडून सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसी येथे छापेमारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित कंपनी सील करून, येथून जवळपास आठ किलो एमडी ड्रग्स जप्त केला आहे.
सोलापूर येथील कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 2016 साली सोलापुरातील याच चिंचोळी एमआयडीसी परिसरातील अवोन लाईफ साईन्सेस नावाच्या कंपनीत अशाच पद्धतीने ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत इफेड्रीन ड्रग्सचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी देखील तब्बल 18 हजार 623 किलो ड्रग्स ठाणे गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा अशीच कारवाई करण्यात आली आहे.
[ad_2]