Pune Maharashtra Next 10 Days Block On Pune-Mumbai Expressway It Will Be Taken In Stages Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्याहून (Pune) मुंबईकडे (Mumbai) येणाऱ्या मार्गांवर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) पुढील दहा दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. यशवंतरावर चव्हाण द्रुतगती  मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हे काम करण्यात येणार आहे. 17,19 आणि 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये द्रुतगतीमार्गावरील मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून माहिती देण्यात आली आहे. 

‘असा’ असणार ब्लॉक

यशंवतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर 17 ऑक्टोबर रोजी पुणे वाहिनीवरील खंडाळा बोगद्याजवळ 47/900 कि.मी आणि लोणावळा बोगद्याजवळ 50/100 येथे ग्रॅन्ट्रीचे काम सुरु करण्यात येणार आहे.  तर 18 ऑक्टोबर रोजी   मुंबई वाहिनीवरील दस्तुरी पोलीस चौकी जवळ कि.मी. 44/800 आणि खालापूरजवळ कि.मी 33/800 ग्रॅन्ट्री उभारण्यात येईल. तसेच 19 ऑक्टोबर रोजी  ढेकू गाव कि.मी. 37/800 आणि  कि.मी. 37 जवळ ग्रॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. तर खोपोली एक्झीटजवळ कि.मी 39/800 वर ग्रॅन्टी उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. 

या वेळत आणि या दिवशी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत सरद वाहिनीवरील वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 1 नंतर ही वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही पुढील दहा दिवसांमध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणार असाल तर यावेळेमध्ये प्रवास करणं टाळावं लागेल. अन्यथा तुमचा बराच वेळ या द्रुतगती मार्गावर खोळंबा होऊ शकतो. 

याआधी देखील घेण्यात आला होता ब्लॉक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 10 ऑक्टोबर रोजी ब्लॉक घेण्यात आला होता.  एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला. दुपारी 12 ते 2 या कालावधीमध्ये हा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे या काळामध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली होती. या ब्लॉक दरम्यान न आयटीएमएस प्रणालीच्या अनुषंगाने ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यात येत आहेत. याच गॅन्ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले जाणार आहेत.  

ITMC प्रकल्प राबवण्यात येणार

अपघात आणि अपघाताची संख्या पाहता इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणीसाठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. 

हेही वाचा : 

पुणे पोलीस भरतीत बनावट प्रमाणपत्र; बीडमधील दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

[ad_2]

Related posts