Maharashtra Politics Pankaja Munde Bjp Leader Said She Is Confused About Her Political Future Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : ‘सध्या मी राज्यात नाही, तर केंद्रात काम करत आहे. त्यामुळे मला बराच संभ्रम निर्माण झाला आहे. कारण तुम्ही कितीही राष्ट्रीय राजकारणात गेलात तरी तुमची मुळं ही राज्यातच असतात. त्यामुळे मला सध्या माझं वयक्तिक राजकारणातला कल हा स्पष्ट व्हायचा आहे’, असं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ‘माझा कट्ट्या’वर (Majha Katta) म्हटलं आहे. 

‘माझी कोंडी होतेय असं मला अजिबात वाटत नाही. कारण सध्याच्या परिस्थिती ही फक्त माझीच नाही, तर अनेकांची अशीच परिस्थिती आहे. माझ्या मतदारसंघातील निर्णय हा प्रत्येक पक्षाच्या नेत्याचे पक्षश्रेष्ठी घेतील आणि शेवटी निर्णय हा लोकांचा असतो. पण ज्या पद्धतीने लोकांनी मला पाठबळ दिलं आहे त्यामुळे मला आत्मविश्वास मिळण्यास मदत झाली आहे’, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.  

‘नातं हे दोन्ही बाजूंनी असतं’

नेत्याचं आणि पक्षाचं नातं हे दोन्ही बाजूंनी असतं. जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा पक्ष ऐकतो, जेव्हा पक्ष सांगतो तेव्हा आम्ही ऐकतो. त्यामुळे हे नातं दोन्ही बाजूंनी असतं. म्हणून सध्या पक्ष जसं सांगेल तसं आम्ही आमचं काम करत असतो. वेळ पडली तर पक्ष आमचं ऐकून घेतो,कारण हे नातं दोन्ही बाजूंनी असतं. 

मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं – पंकजा मुंडे 

मुंडे यांनी माझा कट्ट्यावर आरक्षणाविषयी देखील भाष्य केलं यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळायला हवं. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे फार महत्त्वाचं आहे.  जातनिहाय जनगणेवर बोलतना पंकजा मुंडेंनी म्हटलं की तो अपरिहार्य विषय आहे. ‘

‘माझ्या कारखान्यावर जेव्हा कारवाई झाली त्यानंतर चार दिवसांनंतर ती बातमी आली. त्यानंतरही मी स्पष्ट सांगितलं की माझा कारखाना दिवाळखोर झाला आहे. कारण आम्हाला शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते, जे आम्ही आधी दिले. त्यानंतर जीएसटीचे पैसे भरायला पैसेच उरले नाहीत म्हणून ती कारवाई झाली. आम्ही कर्ज भरलं नाही म्हणून आमच्यावर कारवाई झाली’, असं पंकजा मुडेंनी म्हटलं. 

भाजपच्या राजकिय प्रवासमधील दोन महत्त्वाची नावे म्हणजे मुंडे आणि महाजन. याच मुंडे आणि महाजन घराण्याचा राजकीय घरण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे यांना भाजपमधून साईडलाईन केलं जात आहे का, हा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. याच बाबतीत त्यांचं मत काय आहे याविषयी त्यांनी माझा कट्टावर उलगडा केला आहे. महाराष्ट्र भाजपमधून एकही महत्त्वाचं पद नसणं, विधानसभेतील पराभवनानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन होणं, अचानक त्यांनी राजकारणातून ब्रेक घेणं त्यानंतर काढलेल्या शिवशक्ती परिक्रमेनंतर त्यांच्या साखर कारखान्यावर कारवाई होणं यामुळे त्यांची राजकीय कोंडी केली जात असल्याचं त्यांच्या समर्थकांना पडला आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांची राजकीय अस्वस्थता काही लपून राहिली नाही. त्याचीच उत्तप पंकजा मुंडे यांनी माझा कट्ट्यावर दिली. 

हेही वाचा : 

Pankaja Munde : महाराष्ट्र भाजपमधून पंकजा मुंडे बाहेर? ‘माझा कट्ट्या’वर पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

[ad_2]

Related posts