[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune University helmet : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात मोटारसायकलवरून येणाऱ्या व्यक्तींसाठी सुरक्षेचा महत्त्वाचा नियम नुकताच लागू करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या आवारात प्रवास करताना सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे निर्देश विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यापीठाला भेट देणाऱ्या कोणत्याही नागरिकांना लागू आहेत. त्यामुळे आता विद्यापीठाच्या परिसरात आता सगळ्यांना हेल्मेट घालूनच प्रवेश मिळणार आहे.
हा निर्णय मोटार वाहन कायदा 1988 मध्ये नमूद केलेल्या नियमांशी संबंधित आहे. या कायद्यानुसार हेल्मेट न वापरणे हा दंडनीय गुन्हा मानला जाईल. त्यामुळे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालये, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांनी या सुरक्षिततेचे पालन करणे बंधनकारक आहे.
मोटार वाहन कायद्यातील कलम 129 चे काटेकोपणे पालन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश जारी केले आहेत. या निर्देशांच्या अनुषंगाने विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रक काढून विद्यापीठाच्या आवारात दुचाकीवरून प्रवास करताना सर्व कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे. हेल्मेट नियमाचे पालन न केल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार शिक्षा होईल, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यावर भर दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनांवर भर देत डॉ. काळे यांनी विद्यापीठाच्या आवारात दुचाकींचा वापर करताना हेल्मेट घालणे आवश्यक असल्याचं सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात लाक्षणिक हेल्मेट दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी पुणे शहरातील सगळ्या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं होतं शिवाय अनेक शासकीय कार्यालयासमोर वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते पुण्यातील विविध कार्यलयाच्या बाहेर ट्रॅफिक पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली होती. त्यात तब्बल 622 शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.
सुरुवातीला जनजागृती करणे आणि सरकारी कार्यालयात येणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्यास प्रोत्साहित करणे यावर भर दिला जाईल. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवरही कडक कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हा उपक्रम सुलभ करण्यासाठी, विद्यमान वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयांच्या आजूबाजूच्या भागात नियुक्त करण्यात आले होते. त्यात तब्बल 622कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. आता विद्यापीठातदेखील अशीच कारवाई करण्यात येणार आहे.
[ad_2]