Ahmednagar Politics Bjp Radhakrishna Vikhe Patil Vs Ram Shinde Amid Pm Modi Shirdi Visit Maharashtra Politics News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर: भाजपचे सर्वच मोठे नेते अहमदनगरच्या (Ahmednagar) उत्तर भागात येतात, त्यांचे सर्वच कार्यक्रम राधाकृष्ण विखे पाटलांच्या (Radhakrishna Vikhe Patil) भागात होतात, त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्याला कुठेतरी डावललं जात असल्याची भावना त्या ठिकाणच्या नेत्यांमध्ये आहे. माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली. तर आमदार मोनिका राजळे यांनी शिर्डीसारखे एखादे मंदिर दक्षिण नगरमध्ये बांधलं पाहिजे, म्हणजे भाजप नेते दक्षिणेलाही येतील असा टोला लगावला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नगरच्या उत्तर आणि दक्षिणेतील नेत्यांमधील मतभेद समोर आल्याची चर्चा रंगली आहे. 

पंतप्रधान मोदी हे अहमदनगरच्या शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दरम्यान भाजपच्या सर्वच मोठ्या नेत्यांचे दौरे हे उत्तर अहमदनगर जिल्ह्यात होतात. कधी शिर्डी तर कधी लोणी-राहता येथे कार्यक्रम होतात. त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्याला कुठेतरी डावलले जात असल्याची भावना भाजपचे आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केली. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 

सर्वच नेत्यांचे कार्यक्रम राधाकृष्ण विखे पाटलांच्या मतदारसंघात

राधाकृष्ण विखे हे जेव्हापासून नगरचे पालकमंत्री झालेत तेव्हापासून भाजपच्या सर्वोच्च नेत्यांचे अनेक कार्यक्रम हे त्यांच्याच मतदारसंघात घेतले जात आहेत. त्यामुळे मूळ भाजपमधील नेत्यांमध्ये कुठेतरी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. याबाबत बोलताना भाजप आमदार मोनिका राजळे यांनी शिर्डी प्रमाणे एखादे देवस्थान दक्षिणकडे उभारावे लागेल म्हणजे मोठे नेते दक्षिणकडे येतील असं म्हटलं. तर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही याबाबत दुजोरा देत भविष्यात दक्षिणकडेही कार्यक्रम घेणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी सांगितले असल्याचे म्हटलं. 

सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून नगर जिल्ह्यातील दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील भाजपमधील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून येतं. याबाबत राधाकृष्ण विखेंना विचारले असते असे कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी म्हटलं. भविष्यात दक्षिणेकडेही कार्यक्रम होतील असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत विचारले असता तो मुद्दा आता जुना झाला असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. तर ओबीसींची जनगणना व्हावी अशी मागणी होत असल्याबाबत प्रतिक्रिया देताना सरकार यथाअवकाश त्याबाबत निर्णय घेईल असं म्हटलं आहे.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts