मेट्रो 2 बी लाईन मंडाळे कारशेडचे 70 टक्के काम पूर्ण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मेट्रो 2बी लाइन (डी.एन.नगर, अंधेरी पश्चिम-मांडाळे ) कारशेडच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत कारशेडचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (MMRDA) उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आणि 2024 पर्यंत ‘मेट्रो 2B’ लाईन सेवेत आणण्याचा मानस आहे.

‘मेट्रो 2B’ लाईन ही MMRDA ने हाती घेतलेल्या 337 किमी मेट्रो प्रकल्पातील एक महत्त्वाची लाईन आहे. हा मार्ग 23.64 किमी लांबीचा असून या मार्गामुळे पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाणे सोपे होणार आहे. या मार्गासाठी मांदळे येथे 31 एकर जागेवर कारशेड बांधण्यात येत आहे. 

कारशेडमध्ये एकावेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या केल्या जाऊ शकतात. दरम्यान, या मार्गाचे काम 2024 मध्ये पूर्ण होऊन हा मार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएने कारशेडच्या कामाला गती दिली आहे.

आतापर्यंत कारशेडचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये ‘स्टेबलिंग कास्टिंग यार्ड फेज 1’ चे 96 टक्के आणि ‘स्टेबलिंग कास्टिंग यार्ड फेज 2’ चे 36 टक्के काम पूर्ण झाले आहे. ट्रेनच्या चाचणीसाठी 75 टक्के ट्रॅक पूर्ण झाले आहेत. एकूणच कारशेडचे काम वेगाने सुरू असून कारशेडसह ‘मेट्रो 2 बी’ मार्गाचे काम 2024 मध्ये पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे.


हेही वाचा

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प : दुसरा भूमिगत बोगदा खोदण्यात यश

भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा नोव्हेंबरमध्ये सुरू होईल

[ad_2]

Related posts