अश्लील साईटवर टाकला पत्नीचा मोबाइल नंबर आणि फोटो; नंतर मित्रांकडे पाठवलं आणि म्हणाला “रोज रात्री…”

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News: गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे जुगार आणि सट्टेबाजीत पैसे गमावल्यानंतर एका व्यक्तीने चक्क आपल्या पत्नीच्या मार्फत पैसे कमावण्यास सुरुवात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पतीने पत्नीला जबरदस्ती देहविक्री करायला लावली. यासाठी तो तिला आपल्या मित्रांकडे पाठवत होता. यामधून मिळणाऱ्या पैशातून तो आपली जुगार आणि सट्टेबाजीच्या व्यसनाची भूक मिटवत होता. पीडित पत्नीने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, नरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, पीडित महिला आणि आरोपी पतीचा प्रेमविवाह होता. आरोपीने आपण एक मोठे व्यावसायिक असल्याचं महिलेला सांगितलं होतं. लग्नानंतर त्यांना एक मुलगीही झाली. 

दरम्यान लग्नानंतर महिलेला आपल्या पतीला क्रिकेटवर सट्टा लावण्याचं आणि जुगार खेळण्याचं व्यसन असल्याची माहिती मिळाली. यानंतर तिने अनेकदा पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण काही केलं तरी पती मात्र व्यसन सोडण्यास तयार नव्हता. आरोपीने नंतर पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यानंतर तो सतत सट्टेबाजीत पैसे गमावू लागला होता. 

सट्टेबाजीमुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला असता त्याने पत्नीला आपल्या मित्रांसह शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितलं. पत्नीने विरोध केला असता आरोपी पतीने आपल्याच मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. 

आरोपीने पत्नीला धमकावत तसंच घाबरवत जबरदस्ती देहविक्रीत ढकललं. यातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी सट्टेबाजी करत होता. तसंच डोक्यावर असलेलं कर्ज फेडत होता. एके दिवशी पत्नीने विरोध केला असता त्याने पत्नीचा न्यूड फोटो आणि मोबाइल क्रमांक अश्लील साईटवर अपलोड केला . 

अश्लील साईटवर नंबर गेल्यानंतर महिलेला वारंवार फोन येऊ लागले. सततचे येणारे हे फोन आणि त्यावरील अश्लील संभाषणाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर आरोपीने पत्नीला घराबाहेर काढलं आणि मुलीला आपल्याकडेच ठेवून घेतलं. पीडित महिलेने मुलीला मिळवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी तयार होत नव्हता. अखेर पीडित महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

Related posts