Maratha Reservation Sunil Kawale Suicide Note Maharashtra News Sunil Kawale Letter To Manoj Jarange

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीला धक्कादायक वळण लागलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत एका 45 वर्षीय व्यक्तिने भर रस्त्यावर गळफास घेत आत्महत्या केलीय. सुनील कावळे असं त्याचं नाव आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पुलाच्या खांबाला गळफास घेत त्याने आपलं जीवन संपवलं. जालन्यातल्या मराठा आंदोलनात सुनील कावळे (Sunil Kawale) हा व्यक्ती सक्रीय होता अशी माहिती आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलीय.  दरम्यान सुनील कावळे नी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हंटलंय

सुनील कावळेंनी मनोज जरांगेंना पत्र लिहिली आहे.  सुनील कावळेंचं मृत्यूपूर्व पत्र लिहिले आहे. मराठा आरक्षण, मगच इलेक्शन असा इशारा सुसाईड नोटमधून देण्यात आला आहेय.  या पत्रात त्यांनी 24 ऑक्टोबरला त्यांनी मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच पत्राच्या शेवटी माफी देखील मागितली आहे 

महाराष्ट्राचं कुलदैवत  तुळजाभवानी माता  हिंदूधर्मरक्षरक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत  छत्रपती शिवाजी महाराज  यांना मानाचा मुजरा 
जय भवानी जय शिवाजी 

मी सुनील बाबूराव कावळे, 
मु. पो. चिकणगाव, 
तालुका अंबड, जिल्हा जालना 

एकच मिशन, मराठा आरक्षण,  एक मराठा लाख मराठा… साहेब आता कोण्या  नेत्याच्या सभेला जायचं नाही. ऑक्टोबर 24 हा मराठा
आरक्षण दिवस, या मुंबईमध्येच… आता माघार नाही. कोणी काहीही बोलू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांचं नाव तोंडातून काढू नका 
आता फक्त आणि फक्त  मराठा आरक्षणासाठी या  मुंबईमध्ये उपोषणाला बसू. ऊठ मराठा जागा हो…  पण लक्षात ठेवा, शांततेत  यायचंय… शेतकऱ्यांच्या  मुला-मुलींच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. मराठा शेतकरी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. सण-वार काय येत राहतील,  पण आता एकच मिशन मराठा आरक्षण संत, महंत आणि  कीर्तनकारांनी कीर्तनातून  मराठा आरक्षण समजावलं. 

आपण चार पाच दिवस उपोषण केलं, तर कुणी मरत नाही… कोरोनाचं संकट आलंच होतं ना? दोन महिने घरात  बसलेच होते ना? काय झालं? चारपाच दिवस शाळेत गेलं नाही, तरीही काहीही फरक पडत नाही. लढा गरजवंतांचा, लढा निष्ठावंतांचा  लढा शौर्यवंतांचा बहुसंख्य असूनही शांततेच्या  मार्गाने चालणाऱ्या मराठ्यांचं आता एकच मिशन…. आधी मराठा आरक्षण…  मगच इलेक्शन  मला वाटलं, मी केलं… मला मोठ्या मनाने माफ करा! मी क्षमा मागतो. 
सर्वांनी मला माफ करावं.

विनोद पाटील यांचे आवाहन

आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका, असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.  लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 

[ad_2]

Related posts