[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
supriya sule : शशिकांत शिंदे यांच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल हा शब्द देते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मी राजकारणात आले ते सुप्रिम कोर्टाची पायरी चढायला आलेली नाही. काम करायला आली आहे. शिंदेंच्या नावावर बोलताना जरा जपून बोलावे लागते. माझे आजोळ शिंदेंचे आहे. ते शिंदे आजून दहा महिने सरकारमध्ये राहतील असा टोला सुप्रिया सुळेंनी लागवला. कार्यकर्त्यांवर जर खोट्या केसेस टाकल्यातर माझ्याशी गाठ आहे. जे पोलिस आहेत त्या पोलिसांची भरती आर आर पाटील यांच्या काळातली असल्याचे सुळे म्हणाल्या. .
शरद पवार साहेबांना सहा दशक निवडून दिले. मी सर्वांसमोर नतमस्त होते फोटो वापरुन काम होत नाहीत संस्कार होत नाहीत. यशवंतरावांचा मानसपुत्र शरद पवार असल्याचे सुळे म्हणाल्या. महाराष्ट्रात कट कारस्तान सुरु आहे. देशात आदृश्य शक्ती आहे ही महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करत असल्याचे शाह म्हणाले. आदृष्य शक्तिने शिवसेनेची काय केले आपन पाहिलेत. मी कधी सुप्रिम कोर्टात गेले नव्हते. पण त्यांच्यामुळे अनुभव आला. त्यांचा वकिल हा माझ्या पतीचा वर्गमित्र आहे. योगा योग ते जिथे काही करतात तेथे कनेक्शन होतेय. ज्यांनी राष्ट्रवदीला जन्म दिला तो माणून तिथे पाच तास बसला होता असेही सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरु
महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरु आहे. देवेंद्र फडणवीसांवरही अन्याय सुरु आहे. फडणवीसांचाही भाजपनं घात केलाय. ही अदृष्य शक्ती आहे. गडकरी यांना मी मानते असेही सुळे म्हणाल्या. मराठी मानसांचे कंबरडे मोडण्याचे पाप करण्याचे काम हे करतायत असे सुळे म्हणाल्या.
पन्नास खोके नॉट ओके
पन्नास खोके नॉट ओके. मी पार्लमेंटमध्ये भाषण केले की त्या खात्याचे नोटिस त्याच दिवशी येते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. साताऱ्यावर मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला खासदारही द्यायचे आहेच आणि आमदारही द्यायचे आहेत. तिकीटाची जबाबदारी शरद पवार आणि जयंत पाटील करतील माझा काही संबध नसल्याचे सुळे म्हणाल्या. बुथ कमिटीची कामे झालेच पाहिजेत. सातारा म्हटलं की शरद पवारांना कोठून उर्जा येते माहिती नसल्याच्य भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
पराभवानंतर शरद पवारांनी आठव्यादिवशी बोलून आमदार करत असल्याचे सांगितलं : शशिकांत शिंदे
माझ्या पराभवानंतर शरद पवारांनी सातारा दौरा रद्द केला, आठव्यादिवशी मला बोलावले आणि सांगितले मी तुला पुन्हा आमदार करतोय, असे शशिकांत शिंदे म्हणाले. सर्वांना शरद पवारांची भिती आहे. केंद्रातलेही घाबरतात आणि गल्लीतलेही घाबरतात. केंद्रात हुकुमशाही पाहिली आणि कोरेगावातह असे शिंदे म्हमाले. विरोधक दिलदार असावा लागतो. सभेसाठी जागा पहात होतो. ज्याची जागा आहे त्याने त्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. अनेकजन थांबलेत. ते म्हणतात आत्ता प्रवेश घेतला तर त्रास होणार नाही. शिवसेनेबरोबर गद्दारी केली. सगळीकडे सांगत सुटले की मी सरकार पाडलय. सगळ्या मंत्रीमंडळामध्ये सागिंतलं इतके कोटी इतके कोटी. आपण एवढे दिवस बघतोय आम्ही एवढे कोटी पाहिले नाहीत. सध्या आमदारांना पोसन्याचे काम सुरु आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. गद्दारांना माफी नसते. महाराष्ट्रात एकही गद्दार निवडून येणार नाही असे शिंदे म्हणाले.
[ad_2]