Nashik Latest News After Sinner Nashik Malegaon Police Action Against More Than Ten Cafes Coffee Shops

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक : सिन्नर, नाशिकनंतर आता मालेगाव पोलिसांनी कॅफेंवर कारवाईचा बडगा उगारला असून शहरातील दहाहून अधिक कॅफेंवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी नुसती कारवाई न करता संबंधित कारवाई दरम्यान आढळून आलेल्या तरुणांचे समुपदेशन करत उपदेशाचा डोसही पाजला. दरम्यान शहरातील अशा कॅफे व्यवसायिकांनी त्वरित शॉप्स बंद करून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कडक कारवाईचा इशारा देखील मालेगाव पोलिसांकडून देण्यात आला आहे. 

नाशिकच्या सिन्नर येथे कॅफेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मनपा व पोलीस प्रशासनाकडून 10 हून अधिक कॅफेवर अवैध व्यवसाय व अश्लीलता आढळून आल्याने संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी कॅफेवर कारवाईचा बडगा उगारत झाडाझडती घेतली असता अनेक ठिकाणी तरुण, तरुणी आढळून आले. यावेळी पोलिसांनी समुपदेशन करत उपदेशाचे डोसही पाजले. जेणेकरून पुढच्या वेळी काही चुका या तरुणांकडून होणार नाही. नाशिक पाठोपाठ मालेगावातही कॅफेवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर काही ठिकाणी धक्कादायक चित्र समोर आले आहे. 

दरम्यान अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह मनपा प्रशासनाने ही कारवाई केली असून शहरातील सर्व कॅफे हाऊसवर कारवाईची ही मोहीम अशी सुरू राहणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये अशा पद्धतीने कॅफे उघडून तरुण तरुणींना आकर्षित केले जात होते. येथील कॅफेंमध्ये कंपार्टमेंट पार्टीशन तयार करून महाविद्यालयीन तरुण तरुणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरवली जात असल्याच्या मालेगाव करांकडून केल्या जात होत्या. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी पथके तयार करून संबंधित कॅफेंवर धाड टाकली. यावेळी शॉप चालकांचे चांगलेच धाबे दणाणले. पोलिसांनी पद्धतशीर कारवाई करत कॅफे चालकांना अद्दल घडवली आहे. तर यावेळी उपस्थित तरुणांना समुदेशन करण्यात आले. 

नाशिकमध्येही कॅफेंवर कारवाई 

नाशिकच्या (Nashik) ड्रग्ज प्रकरणातील शहरातील ड्रग्ज माफियांची (Drug Case) पाळेमुळे खणून काढण्याचे काम पोलिसांकडून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे गल्लो गल्ली, घरोघरी जाऊन तपास केला जात आहे. शाळा, कॉलेजजवळच्या पानटपऱ्या आधी लक्ष्य केल्या जात असून अशा टपऱ्यांवरच अनेकदा ड्रग्जच माहेरघर म्हणून पाहिलं जात. त्यानंतर सद्यस्थितीत शहरातील अनेक भागात कॅफे कॉफी शॉपच्या (cafe Coffee Shop) नावाखाली अवैध धंदे सुरु करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी एकाच दिवसात वेगवगेळ्या ठिकाणी धाड टाकत कारवाया केल्या आहेत. यात प्रायव्हसी पुरविणाऱ्या 08 कॉफी शॉपवर कारवाई करण्यात आली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nashik Crime : नाशिकचं ड्रग्ज प्रकरण चर्चेत, पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, हुक्का पार्लर, कॅफे, पानटपऱ्या केल्या उध्वस्त 

[ad_2]

Related posts