Manoj Jarange Sabha In All Over Maharashtra For Maratha Reservation Manoj Jarange Patil Press Conference Today Know All Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Reservation : बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सभांना राज्यभरात मराठा बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी जरांगे पाटलांनी शिखर शिंगणापूर, इंदापूर, अकलूज, अहमदनगरमधील कर्जतमध्ये सभा घेतली. या दौऱ्यांना मराठा समाजानं (Maratha Samaj) मोठी उपस्थिती लावली होती. तर बीडमधील (Beed News) मांजरसुंब्यामध्ये रात्री 12 वाजता जरांगेंची सभा झाली. त्याही सभेला तुफान गर्दी पाहायला मिळाली. तसेच, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha  Reservation) सरकारला आता एक तासही जादा देणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. तर आज जरांगे पाटलांची दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद आहे. ते आरक्षणाबाबतची पुढची दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे ते आजच्या पत्रकार परिषदेतून काय भूमिका मांडतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला आता एक तासही जादा देणार नाही. 24 तारखेनंतरच आंदोलन सरकारला झेपणार नाही. पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारला आरक्षण द्यायला सांगावं, अन्यथा आम्ही आंदोलन सुरु केलं तर महागात पडेल, असं म्हणत मनोज जरांगेंनी सरकारला पुन्हा एकदा मुदतीची आठवण करुन दिली. तसेच, आरक्षणाची मागणी करत गंभीर इशाराही दिला आहे. 

सरकारनं आरक्षणाचा विषय गांभीर्यानं घ्यावा नाहीतर महागात पडेल : मनोज जरांगे 

मनोज जरांगे बोलताना म्हणाले की, “आपल्या बीड जिल्ह्यात इतक्या रात्री ही विराट शक्ती दाखवून दिली त्याबद्दल आभार. पश्चिम महाराष्ट्रातील सभाना मोठी गर्दी झाली. आता बीडच्या एका भूमिपुत्रनं आत्महत्या केली. आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही. केवळ या शांततेच्या आंदोलनातून आरक्षण मिळणार आहे. सरकारला जाहीर सांगतो, सरकारनं आरक्षणाचा विषय गांभीर्यानं घ्यावा नाहीतर महागात पडेल. तुम्ही तिघेही आणि सगळ मंत्रिमंडळ हे गांभीर्यानं घ्या, आमच्या मुलांच्या आत्महत्या होत आहेत. सरकारला गादीवर मराठ्यांनी बसवलं आहे, आता बहाने सांगू नका.”

मोदीसाहेब सरकारला आरक्षण द्यायला सांगा, आम्ही जर आंदोलन सुरू केलं तर ते महागात पडेल : मनोज जरांगे 

“ड्रोन आणि छगन भुजबळ याचा आवाज सारखाच येतो. माझ्या टप्प्यात आला की, मी सोडत नसतो. आणखी किती पुरावे समिती मागणार आहे. आता आपली क्षमता संपली आहे. सरकारनं सगळ्या बाजुनं घेरलं आहे. 24 तारखेनंतरच आंदोलन सरकारला झेपणार नाही. मोदीसाहेब तुम्हाला हात जोडून विनंती 25 तारीख उजाडू देवू नका, मोदी 26 तारखेला शिर्डीला येणार आहेत, त्यामुळे सरकारला आरक्षण द्यायला सांगा आम्ही जर आंदोलन सुरू केलं तर ते महागात पडेल. आपल्याला 40 आणि धनगर समाजाला 50 दिवसांचा वेळ दिला आहे, आम्ही जर एकत्र अलो तर काय होईल बघा माझ्याच भाषेत मी बोलणार, आमच्या जातीवर पिढ्यान् पिढ्या अन्याय केला आहे.”, असं मनोज जरांगे म्हणाले. 

पाहा व्हिडीओ : Manoj Jarange Akluj Sabha : मनोज जरांगेंच्या सभांचा धडाका, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर निशाणा

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उचलंलं टोकाचं पाऊल, विष प्राशन करत आयुष्य संपवलं

[ad_2]

Related posts