Manoj Jarange Request To Narendra Modi For Maratha Reservation Maharashtra News Update Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Manoj Jarange Maratha Reservation: मनोज जरांगेंची थेट पंतप्रधान मोदींना मराठा आरक्षणासाठी विनंती

 मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सभांना राज्यभरात मराठा बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी जरांगे पाटलांनी शिखर शिंगणापूर, इंदापूर, अकलूज, अहमदनगरमधील कर्जतमध्ये सभा घेतली. या दौऱ्यांना मराठा समाजानं (Maratha Samaj) मोठी उपस्थिती लावली होती. तर बीडमधील (Beed News) मांजरसुंब्यामध्ये रात्री 12 वाजता जरांगेंची सभा झाली. त्याही सभेला तुफान गर्दी पाहायला मिळाली. तसेच, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha  Reservation) सरकारला आता एक तासही जादा देणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. तर आज जरांगे पाटलांची दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद आहे. ते आरक्षणाबाबतची पुढची दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे ते आजच्या पत्रकार परिषदेतून काय भूमिका मांडतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला आता एक तासही जादा देणार नाही. 24 तारखेनंतरच आंदोलन सरकारला झेपणार नाही. पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारला आरक्षण द्यायला सांगावं, अन्यथा आम्ही आंदोलन सुरु केलं तर महागात पडेल, असं म्हणत मनोज जरांगेंनी सरकारला पुन्हा एकदा मुदतीची आठवण करुन दिली. तसेच, आरक्षणाची मागणी करत गंभीर इशाराही दिला आहे. 

[ad_2]

Related posts