Maratha Reservation No Entry To Political Leaders In Sangli Nashik Village Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सांगली : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)  प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil)  यांच्या आवाहनाला सांगली जिल्ह्यातून (Sangli News)  प्रतिसाद मिळायला सुरवात झाली आहे. खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील ग्रामस्थांनी  सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढाऱ्यांना गावात ‘ प्रवेश बंदी ‘ असा मोठा फलक गावाच्या दर्शनी भागावर लावण्यात आले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज  आक्रमक झाला आहे. समाजाचे नेते  मनोज जरांगे-पाटील यांच्या  आदेशानुसार राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर  जरांगे-पाटील यांनी निर्णायक आंदोलन जाहीर केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यांनी त्यांच्या गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. असाच निर्णय  महाराष्ट्रातील सर्व गावांनी घ्यावा, अशी विनंती जरांगे-पाटील यांनी केलीय. या विनंतीला मान देत खानापूर तालुक्यातील  हिंगणगादे गावातील ग्रामस्थनी शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली  आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच राजकीय नेत्याला गावात येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेतला. 

राजकीय नेत्यांना मराठा समाज त्यांची जागा दाखवणार

 आम्ही मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. राज्यातील नेते नारायण राणे, रामदास कदम या वाचाळवीरांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी धडपड सुरू केल्याचे दिसत आहे. परंतु आगामी काळात आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांना मराठा समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील देण्यात आलाय. 

 येवल्यातील देवरगाव, कातरणी येथे  नेत्यांना गावबंदी

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला असून या लढ्याला मराठा समाजातून पाठिंबा मिळत आहे. मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा समाज आरक्षणाला विरोध करणारे राजकीय नेते व कार्यकर्ते सध्या अडचणीत आले आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील कातरणी येथे ग्रामसभा घेण्यात येऊन मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर देवरगाव ग्रामपंचायतीने तहसीलदारांना पत्र देत आरक्षण विरोधी पुढाऱ्यांना गावात ‘ प्रवेश बंदी ‘ असा मोठा फलक गावाच्या दर्शनी भागावर लावला आहे.

हे ही वाचा :

‘माझ्या आई वडिलाचे कष्ट आता मला पाहावत नाही’, नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या; 24 तासात दोन आत्महत्या

 

[ad_2]

Related posts