Haryana Karnal Woman Farmers Grows 4000 Dragon Fruits Plant Preparing For Heavy Profit Next Year 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Woman Farmers : अलिकडच्या काळात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कोणत्याही क्षेत्रात महिला अग्रेसर असल्याचे चित्र दिसत आहे. राजकारण, समाजकारण, शेती, नोकरी या क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत. अशाच एका हरियाणाच्या कर्नालमध्ये राहणाऱ्या पूनम चीमा यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रूट शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय. ही शेती त्यांनी सेंद्रीय पद्धतीनं केली आहे. 

पूनम चीमा यांनी दीड वर्षांपूर्वी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. त्यांनी आपल्या शेतात चार हजाराहून अधिक ड्रॅगन फ्रूटच्या झाडांची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला आहे. ते आपल्या शेतात युरियाचा वापर करत नाहीत. पिकांना ठिबक पद्धतीने पाणी दिले जाते.

ड्रॅगन फ्रूट हे अनेक रोगांवर रामबाण औषध

इतर क्षेत्राप्रमाणेच शेती क्षेत्रातही महिला आपलं नाव कमवताना दिसत आहेत. अशीच एक महिला शेतकरी पूनम चीमा, कर्नालची रहिवासी आहे. सध्या ती 2 एकरात 4 हजाराहून अधिक रोपे लावून ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहे. ती आपल्या परिसरातील इतर महिलांसाठी एक उदाहरण ठरत आहे. पूनम चीमा यांनी दीड वर्षांपूर्वी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. ड्रॅगन फ्रूट हे अनेक रोगांवर रामबाण औषध आहे. ड्रॅगन फ्रूट आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक रोगांवर हा रामबाण उपाय आहे. डेंग्यूपासून ते इतर आजारांपर्यंत लोक ते भरपूर खातात. ते खाल्ल्याने आपल्या शरीराला खनिजेही मिळतात. सुरुवातीचा काळ असल्यामुळं फळे कमी आली आहेत. त्यामुळं जी काही फळे आली आहेत ती आम्ही आमच्या नातेवाईकांना दिली आहेत. पण त्याच्या मार्केटिंगसाठी आम्ही कर्नाल, कुरुक्षेत्र, अंबाला, चंदीगडबद्दल बोललो आहोत. येत्या काही दिवसांत आणखी फळांची आवक झाली की, आम्ही त्यांची तेथे विक्री करणार असल्याची माहिती पूनम चीमा यांनी दिली.

ड्रॅगन फ्रूटची लागवड समजून घेण्यासाठी पूनम चीमा यांनी विविध ठिकाणच्या शेतांना भेटी देऊन ड्रॅगन फ्रूटची लागवड कशी केली जाते याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. आता पूनमही बागकामाकडे वळल्या आहेत. त्यांनी काही ठिकाणी मिश्र फळांची झाडेही लावली आहेत. त्याही पारंपारिक शेती करत होत्या. मात्र, त्यांनी आता ड्रॅगन फ्रूटसह फळबाग व्यवसाय करत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. राजकारण, समाजकारण, शेती, व्यवसाय, नोकरी या सर्व क्षेत्रात महिला चांगल काम करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Success Story: शेती करण्यास पतीचा नकार, पत्नीनं सांभाळला मोर्चा; आज करतेय लाखोंचा नफा

[ad_2]

Related posts