BJP Leader Pankaja Munde Dasara Melava Address Social And Political Issue In Dasara Melava At Savargaon Beed Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बीड :  भाजपच्या राजकीय पटलावरावरून काहीशा दूर असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. याआधीच्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) पंकजा यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर आता, मंगळवारी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात कोणत्या मुद्यावर भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

राज्यात दसऱ्यानिमित्ताने होणाऱ्या काही दसरा मेळाव्यांना महत्त्व आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा, शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा याचा समावेश होतो. 2019 विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर पंकजा मुंडे या महाराष्ट्र भाजपमध्ये सक्रिय नसल्याचे चित्र दिसून आले. पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी भाजपमधील एक गट कार्यरत असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पंकजा यांना भाजपकडून संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. मात्र, पंकजा या मध्य प्रदेशमध्ये फार सक्रीय नसल्याचेही म्हटले जात आहे. 

दसरा मेळाव्यात पंकजा कोणत्या मुद्यावर करणार भाष्य?

सावरगावच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे या कोणत्या मुद्यावर भाष्य करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्याची राजकीय स्थिती आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करणार असल्याचे म्हटले जात आहे. पंकजा मुंडे आपल्या भाषणातून राजकीय आणि सामाजिक संदेश ही देणार असल्याची चर्चा आहे. 

बीडच्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. पंकजा मुंडे या सकाळी वैजनाथाचं दर्शन घेऊन त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळावर दाखल होतील आणि अभिवादन करतील. त्यानंतर सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात सहभागी होऊन संबोधित करणार आहेत. पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रा काढली होती आणि यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांच्या कारखान्यावर कारवाई झाली होती.  सध्या महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे यावर पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील देवीचे होम हवन केले. 

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

पंकजा मुंडे यांनी म्हटले की, यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी लोकांकडून चांगला प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. लोकांनीच हा मेळावा हाती घेतल्याची परिस्थिती आहे. लोकांनी स्वत: हून मेळाव्याचा प्रचार सुरू केला असल्याचे त्यांनी म्हटले. शिवशक्ती परिक्रमा झाली आहे. राज्यातील राजकारणात अनेक बदल झाले आहेत. अनेक दशकातील राजकीय बदल या मागील काही वर्षात झाले असल्याची टिप्पणी पंकजा मुंडे यांनी केली. लोकांमध्ये विविध मुद्यांवर रोष आहे. यामध्ये नोकर भरतीपासून ते जीवनाशी निगडीत अनेक मुद्यांवर रोष असल्याचे ही त्यांनी म्हटले. माझं भाषण नैसर्गिक असते. ठरवून कोणत्याही मुद्यावर भाषण केले जात नाही, असेही मुंडे यांनी सांगितले. प्रीतम मुंडे रॅलीने दसरा मेळाव्यात येतात. त्यांचे जागोजागी स्वागत होते. पण, दसरा मेळाव्यात यंदा रॅली काढली जाणार नाही. रॅलीत असणाऱ्यांना दसरा मेळाव्यातील पूर्ण भाषणं ऐकण्यास मिळावीत यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय, प्रीतम मुंडे या आजारी असल्याची माहिती त्यांनी दिली.

Pankaja Munde: पंकजा मुंडे मेळाव्यातून कोणता राजकीय, सामाजिक संदेश देणार?

[ad_2]

Related posts