Stray Dogs Bites And Attack On Citizen 1 Crore 60 Lakh Case Register In Last Four Years

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  देशातील प्रसिद्ध चहा ब्रँडपैकी एक असलेल्या वाघ बकरी चहा (Wagh Bakri Tea) ब्रँडसाठी प्रसिद्ध गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड (Gujarat Tea Processors & Packers Ltd.) चे कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाले. भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) उच्छादाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 2019 ते 2022 या कालावधीत भटक्या कुत्र्यांनी एक कोटी 60 लाखजणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. 

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांची वारंवार चर्चा होत असते. भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळलेले नागरीक आणि श्वान प्रेमींमध्ये वाद झडत असतात. भारतात भटक्या कुत्र्यांची संख्या चार ते सहा कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. संसदेत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2019 ते 2022 या काळात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या किमान एक कोटी 60 लाख घटनांची नोंद करण्यात आली आहेय याचाच अर्थ या कालावधीत भटके कुत्रे चावल्याच्या दररोज किमान 10 हजार घटनांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली. रेबीज या आजारामुळे दरवर्षी 21 हजार मृत्यू होतात, यातील 99 टक्के जणांना रेबीज लागण कुत्र्यांमुळे होते अशी जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. 

भटक्या कुत्र्यांचा मुद्दा मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. अनेकांकडून भटक्या श्वानांना जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे श्वानप्रेमींकडून याला विरोध केला जात आहे. मागील काही काळात विविध ठिकाणी भटक्या श्वानांनी लहान मुलांवर हल्ला केल्याची घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी एका लहान मुलाला कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र, त्याने ही बाब घरच्यांचा सांगितली नव्हती. त्यामुळे त्याला रेबिजची लागण झाली होती. त्याच्या अखेरच्या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

सोलापुरात पिट बुल श्वानाचा हल्ला

काही दिवसांपूर्वी सोलापूरमधील  एमआयडीसी परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण टॉकीज समोर असलेल्या एका व्यावसायिकने पिट बुल प्रजातीचे कुत्रा पाळला आहे. यावेळी, आसिफ मुल्ला हा कंपाउंडच्या आत गेल्यानंतर पिट बुलने त्याच्यावर हल्ला चढवला. तर, हल्ला करणाऱ्या या कुत्र्याने आसिफ याच्या अंगाचे अक्षरशः लचके तोडलेत. कुत्र्याच्या हल्ल्यात आसिफ गंभीर जखमी असताना ही उपस्थितपैकी कोणीही कंपाउंडच्या आत जाऊन त्याला वाचवण्याची हिंमत दाखवू शकला नाही. मात्र, आसिफ स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत होता. काही वेळानंतर आसिफ यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिट बुल प्रजातीच्या श्वान पाळण्यासाठी जगातील अनेक देशात बंदी आहे. देशात देखील उत्तरप्रदेश आणि दिल्ली सारख्या राज्यात पिट बुल पाळण्यावर बंदी आहे. 

[ad_2]

Related posts