[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
घोडबंदर येथील कासारवडवली परिसरात मेट्रो मार्गावर बीम बसवण्याचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतूक बदल लागू करण्यात आला आहे. त्यानुसार या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. हा वाहतूक बदल ३० ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.
वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो फोर लाईनचे काम ठाणे शहर आणि घोडबंदर परिसरात सुरू आहे. याच कामाचा एक भाग म्हणून कासारवडवली ते वेदांत हॉस्पिटलपर्यंतच्या परिसरात मेट्रो मार्गाच्या पिलरवर ‘यू’ आकाराचा बीम बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामादरम्यान वाहतूक कोंडी किंवा अपघात होऊ नयेत, यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केला आहे.
घोडबंदर ते ठाण्याच्या दिशेने कासारवडवली ते वेदांत हॉस्पिटल परिसर अशी एकेरी मार्गिका जड वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. तर हलकी वाहने सेवा रस्त्यावरील ऑस्कर हॉस्पिटलजवळून मुख्य रस्त्यावरील कासारवडवली सिग्नलपर्यंत किंवा सेवा रस्त्यावरील पेट्रोल पंपापासून वेदांत हॉस्पिटलपर्यंत मुख्य रस्त्यावरून जातील. हे वाहतूक बदल 30 ऑक्टोबरपर्यंत दुपारी 12:00 ते पहाटे 5:00 वाजेपर्यंत लागू राहतील.
हेही वाचा
गोखले पूलाचा महुर्त पुन्हा टळला, आता ‘या’ तारखेला होणार उद्घाटन
[ad_2]