Lalit Patil Also Stayed In Chhatrapati Sambhajinagar After Sassoon Hospital Ran Away

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज रॅकेट (Drugs Racket) प्रकरण चर्चेत आले आहे. तर, या प्रकरणात रोज नवनवीन माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान, आता याच प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर ललित पाटीलने छत्रपती संभाजीनगरमध्येही मुक्काम केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच गुजरात पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरात छापेमारी करत तब्बल 500 कोटींचे ड्रग्ज ड्रग्ज पकडले होते. त्यामुळे आता ललित पाटीलचे छत्रपती संभाजीनगर कनेक्शन नेमकं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिले आहे. 

पुण्यातील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर ललित पाटील अधिक चर्चेत आला. त्यानंतर नाशिकमध्ये त्याचे ड्रग्जचा कारखाना सुरु असल्याचे समोर आले. तर, नाशिक शहरात त्याचे स्वतंत्र नेटवर्क असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर तो पहिले गुजरातमधील मित्रांकडे गेला होता. तेथून बंगळुरूला पळून जाण्याआधी त्याने छत्रपती संभाजीनगर शहरात मुक्काम ठोकला. शहरात जवळपास 12 तास थांबल्यानंतर तो पुढे रवाना झाला. या दरम्यान तो कशासाठी थांबला होता, कोणाला भेटला, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 

संभाजीनगरमधील कारवाईशी ललित पाटीलचे काही कनेक्शन आहे का? 

राज्यात अनेक जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात मोठ्या कारवाईंचं सत्र सुरु आहे. याचवेळी छत्रपती संभाजीनगरमध्येही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 40 किलो कोकेन, 32 लाख रोख रुपये पोलिसांना मुख्य आरोपीच्या घरातून मिळाले आहेत. विशेष म्हणजे, गुजरातच्या अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय यांच्या या संयुक्त कारवाईत शहरात प्रथमच 500 कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा प्रचंड मोठा साठा जप्त करण्यात आला. एकीकडे एवढी मोठी कारवाई झाली असतानाच, त्यापूर्वी ललित पाटीलने छत्रपती संभाजीनगर शहरात मुक्काम ठोकला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईतील आरोपी जितेशकुमार प्रेमजीभाई हिनहोरि आणि ललित पाटीलचे काही कनेक्शन आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

सूनमधील कैद्यांच्या नोंदीचं रजिस्टर ‘एबीपी माझा’च्या हाती

ड्रग्ज माफिया ललित पाटील ससुन रुग्णालयातून पळाल्यावर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी जेव्हा त्याला बेड्या ठोकल्या, त्यावेळी आपण पळून गेलो नसून आपल्याला पळवण्यात आल्याचे त्याने म्हटले होते. त्यामुळे, ललित पाटीलवर ससूनमध्ये उपचार नक्की कोणत्या डॉक्टरांनी केले, त्याला कोणते आजार होते याची माहिती देण्यास आजपर्यंत ससुनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी नकार दिला होता. पत्रकार असतील,  विभागीय आयुक्त असतील किंवा राजकीय नेते असतील डॉक्टर संजीव ठाकूर यांनी गोपनीयतेच्य नावाखाली ही माहिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला. मात्र, ससूनमधे उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे रजिस्टरच एबीपी माझाच्या हाती लागले आहे. विशेष म्हणजे ललित पाटीलवर स्वतः डीन डॉक्टर संजीव ठाकूरच उपचार करत असल्याचे आता समोर आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये पुणे डीआरआयची मोठी कारवाई;  कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक 

[ad_2]

Related posts