Lalit Patil Drug Case MLA Ravindra Dhangekar Allegation On Sasoon Hospital Dean Sanjiv Thakur

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलवर डॉ. संजीव ठाकूर उपचार करत असल्याचं (Sasoon Hospital Drug Racket) कैद्यांच्या नोंदी असलेल्या रजिस्टरमधून समोर आलं. त्यानंतर उपचाराच्या नोंदी असलेलं रजिस्टर संजीव ठाकूर यांनी लपवलं आणि त्याच्यावर बोगस उपचार करत होते, असा आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी संजीव ठाकूर यांच्यावर केले आहेत. ललित पाटीलला संजीव ठाकूरने तातडीने हर्नियाची शस्त्रक्रिया सांगितली होती. मात्र, त्यानंतर त्याने पळ काढला. शिवाय तातडीने शस्त्रक्रिया सांगितल्यावर 10 दिवस वेगवेगळ्या शहरात तो फिरत कसा होता?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

धंगेकर म्हणाले की, मी संजीव ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. त्यात ललित पाटीलवर कोणते डॉक्टर उपचार करत होते, असं विचारलं होतं. मात्र त्यांनी त्यावेळी उडवाउडवीची उत्तरं दिली होती. शिवाय त्यांनी सगळ्या नोंदी असलेलं रजिस्टरदेखील त्यावेळी गोपनीय माहितीच्या नावाखाली लपवून ठेवलं.

गुन्हेगारासोबत वावर असलेल्या मंत्र्याचा हात 

या संपूर्ण प्रकरणात संजीव ठाकूर यांना मंत्र्याचा पाठिंबा आहे. त्याशिवाय एवढी हिम्मत होत नाही. त्यांच्यावर बोगस उपचार सुरु होते आणि ससूनमध्ये ललित हा फक्त ड्रग्ज रॅकेट चालवण्यासाठी भरती होता, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यासोबतच गुन्हेगारांसोबत वावर असलेल्या मंत्र्याचा या प्रकरणात हात आहे. एवढंच नाही तर पोलीस आणि ससूनच्या बाकी अधिकाऱ्यांचादेखील पाठिंबा असल्याचं धंगेकरांनी स्पष्ट केलं आहे. 

पोलिसांचा भक्कम पाठिंबा

धंगेकरांनी पोलिसांवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं कि ललित पाटीलला नक्की शोधून काढू आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ललित पाटीलला पोलिसांनी शोधून काढलं होतं. यातून ललितला पोलिसांचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आता या ललित पाटीलचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी धंगेकरांनी केली आहे. 

कोणालाही अटक का नाही झाली?

ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक होणं अपेक्षित होतं मात्र आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही. सुरुवातील प्रकरण समोर येताच ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना अटक करायला हवी होती. मात्र या प्रकरणात फक्त चौकशीचा फार्स सुरु आहे. योग्य कारवाई होताना दिसत नसल्याचं धंगेकर म्हणाले आहे.  सगळ्यांच्या कृत्यावर पांघरुण टाकण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

इतर महत्वाची माहिती-

Lalit Patil drug Case : ललित पाटीलचा ससूनमध्ये पाहुणचार कोण करत होतं? ससूनमधील कैद्यांच्या नोंदीचं रजिस्टर ‘एबीपी माझा’च्या हाती

 

[ad_2]

Related posts