Gambling In Superintendent Of Police Office Crimes Filed Against Seven Policemen Parbhani News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

परभणी : आजपर्यंत पोलिसांकडून जुगाऱ्यांवर कारवाई केल्याचं सर्वांना माहिती आहे. मात्र, परभणीत (Parbhani) याउलट पोलीस अधीक्षकांनीच जुगारी पोलिसांवर छापा टाकत सात जणांना पकडले आहे. परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील आरसीबीच्या रेस्ट रूममध्ये हे सात पोलीस कर्मचारी जुगार खेळत होते. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी थेट या ठिकाणी जात सात जणांना रंगेहात पकडले आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील दिले. 

परभणी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरामध्ये आरसीपी पथकासाठी रेस्ट रूम आहे. या रेस्ट रूममध्ये काही पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी थेट या रूमकडे जाऊन पाहणी केली. यावेळी 7 पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याचे यावेळी त्यांना पाहायला मिळाले. याचवेळी त्यांच्याकडून पाच हजार रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या 7 जणांमध्ये पाच पोलीस अधीक्षक कार्यालयातील, एक महामार्ग पोलीस आणि एक अँटी करप्शन ब्युरोमधील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणी सातही जणांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये 12 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातच डाव मांडला… 

परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयातून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात येते. अनेक महत्वाच्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी येथूनच वरिष्ठांचे आदेश जातात. विशेष म्हणजे परभणी ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख देखील याच कार्यालयात बसतात. मात्र, त्यांच्याच कार्यालयात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट जुगाराचे डाव मांडला होता. मात्र, याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांनी जुगारी पोलिसांवर कारवाई केली आहे. 

पोलीस दलात खळबळ…

पोलीस अधीक्षक कार्यालयात जुगार खेळणाऱ्या पोलिसांवरच पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केल्याने परभणी पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दिवसभर या घटनेची पोलीस दलात जोरदार चर्चा पाहायला मिळाली. आतापर्यंत जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस कारवाई करायचे, मात्र या प्रकरणात थेट पोलिसांवरच कारवाई करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. 

अन् कर्मचाऱ्यांना धक्काच बसला… 

आरसीपी पथकाला थांबण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात एका खोलीत व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, यातील काही पोलीस कर्मचारी इतर पथकाच्या कर्मचाऱ्यांसोबत घेत याच खोलीत पैशांवर जुगार खेळत होते. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी याठिकाणी छापा टाकला. मात्र, आपल्या खोलीत थेट पोलीस अधीक्षक आल्याचे पाहून जुगार खेळणाऱ्या पोलिसांना धक्काच बसला. नेमकं काय करावे आणि काय नाही याबाबत त्यांना काहीच सुचत नव्हते. मात्र, पोलीस अधीक्षक यांनी त्यांना सुनावत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.  

इतर महत्वाच्या बातम्या: 

Parbhani : मराठा आरक्षणाचा ग्रामपंचायत निवडणुकीला फटका, परभणीत सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, निवडणूक रद्द होण्याची नामुष्की

[ad_2]

Related posts