Pune Maharashtra NCP Leader Rohit Pawar Stopped His Yuva Sangharsha Yatra To Support Maratha Reservation Protest Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यातील युवकांच्या प्रश्नांसाठी युवा संघर्ष यात्रा सुरु केली होती. पण आता ही यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय रोहित पवार घेतला आहे. राज्यातील मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी रोहित पवारांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी सगळे जण प्रयत्न करत आहेत, त्यांना साथ देणं गरजेचं आहे, त्यामुळे यात्रा स्थगित केली  असल्याचं यावेळी रोहित पवारांनी म्हटलं. तसेच या मुद्दा सोडवण्यासाठी रोहित पवार यांनी विशेष अधिवेशनाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 

जरांगे पाटलांनी पुकरालेल्या आंदोलानाची परिस्थिती दिवसागणिक तीव्र होत आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती, राज्यातील आंदोलनाची परिस्थिती आणि युवकांची स्थिती पाहता हा निर्णय घेणं गरजेचं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. तसेच राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेक तरुणांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या देखील केली, या सगळ्या चिंताजनक परिस्थितीमुळे रोहित पवारांनी त्यांची यात्रा स्थगित केली. 

गावबंदीमुळे यात्रा थांबवली नाही – रोहित पवार

मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण पुकराल्यानंतर प्रत्येक गावात कोणत्याही नेत्याला येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण या गावबंदीमुळे यात्रा थांबवली नसल्याचं रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘आम्ही संवदेनशील आहोत. आमचीच मुलं आत्महत्या करतात. त्यामुळे आम्ही ही यात्रा पुढे घेऊन जाऊ शकत नाही.’

स्वाभिमानी महाराष्ट्र शांत राहायला हवा – रोहित पवार 

रोहित पवार यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, ‘राज्यातील युवा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली आहे. या यात्रेचा आज सकाळचा टप्पा जिथे संपला तिथेच आम्ही थांबलो आहोत. पुढे गेलो नाही. छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड सगळी कडचे पदाधिकारी इथे आले आहेत. सातत्याने आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत होतो. पण आता अशांत झालेला स्वाभिमानी महाराष्ट्र शांत व्हायला हवा. त्यासाठी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.’ 

युवा राजकारणामुळे त्रस्त – रोहित पवार

‘आम्ही युवकांच्या प्रश्नासाठी लढत होतो. मात्र सगळीकडे राजकारण सुरु आहे. यामुळे मराठा समाजातील युवक राजकारणामुळे जास्त त्रस्त झालेत. खोटी आश्वासनं दिली जातात आणि मुद्दावर कोणीही बोलत नाही. अनेक प्रकरणांवर चौकशी समिती स्थापन केली जाते. मात्र या समितींचे पुढे काहीही होत नाही. मी यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. मात्र त्याकडेदेखील दुर्लक्ष केलं.लाखो लोकांच्या उपस्थितीत जरांगे पाटलांची सभा झाली होती त्यावेळी इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. सध्याची परिस्थिती बघता युवकांना कुठेही संधी मिळत नाही आहे. त्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष होतय. आता आरक्षणावरुन समाजात राजकारण केलं जात आहे. धनगर आणि मराठा समाजाच्या बाबतीत राजकारण सुरु आहे’, असं म्हणत रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

हेही वाचा : 

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन मागे; पारोडी फाटा येथे केले अन्नग्रहण

[ad_2]

Related posts