[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune Drug Case: पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) याने ससून रुग्णालयातून (Sasoon Hospital Drug Racket) पलायन केल्यानंतर पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. अशातच आता ससून रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
ससून रुग्णालयात कैदी आठ महिने कोणत्या आजारावर उपचार करण्यासाठी राहतात? असा सवाल करत दानवे यांनी त्यांना जाणीवपूर्वक आसरा दिला जात असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. पोलिसांप्रमाणे डॉक्टरही या प्रकरणात दोषी आहेत. येथे डॉक्टर औषधोपचार करतात की, कैद्यांचं पालन पोषण करतात, असा सवाल दानवे यांनी करत संताप व्यक्त केला आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ससून रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, अपुरा औषध पुरवठा याचा आढावा घेतला, तसेच याबाबत सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत. ससून रुग्णालयात माता मृत्यूचे प्रमाण वाढले असून शून्य रुपयांची औषधे खरेदी झाली आहे. जिल्हा नियोजन मंडळातून एकही रुपया औषधं खरेदीसाठी देण्यात आला नाही. ससून रुग्णालयात झिरो प्रिस्क्रिप्शन नाही, राज्य सरकार खोट बोलत आहे. डॉक्टर रुग्णांना औषध लिहून देतात. एकप्रकारे अतिशय भयावह स्थिती आहे, येथील परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले.
ललित पाटील प्रकरणी महिला सहायक पोलीस निरीक्षक निलंबित
ललित पाटील (Lalit Patil) हा ससूनमधून पळून गेल्याप्रकरणी आणखी एका महिला सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. सविता हनुमंत भागवत असे या महिला सहायक पोलीस निरीक्षक नाव आहे. ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये लक्ष ठेवण्याची जबाबदारी असताना देखील त्यामध्ये कसूर केल्याचा ठपका पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनी ठेवला आहे. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हे आदेश काढले आहेत.
सविता यांची 30 सप्टेंबर रोजी दिवसपाळी होती. मात्र, कर्तव्यावर हजर न राहता केवळ अर्धा तास उपस्थित होत्या. त्याच्या अनुपस्थितीमुळे ललितला एक अज्ञात व्यक्ती भेटली आणि त्यानंतर तो पसार झाला. त्यामुळे कामातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणामुळे आरोपी ललित पाटील याला पळून जाण्यास संधी मिळाली, असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. सविता भागवत यांची नेमणूक मुख्यालयाच्या कोर्ट कंपनी युनिटमध्ये होती. त्यांची 9 ते 9 शिफ्ट होती. यात त्यांनी या सगळ्यावर देखरेख ठेवणं अपेक्षित होतं मात्र त्या पूर्ण वेळ कामावर हजर नसल्याचं समोर आलं आहे. त्यात त्यांनी फक्त अर्धा तास कैद्यांच्या वॉर्डमध्ये गेल्याचं दिसून आलं. हे सगळं पाहता त्यांनी कामात निष्काळजीपणा केल्याचं स्पष्ट झालं आणि त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
[ad_2]