मेहुणीसोबत अनैतिक संबंध, बायकोला खबर लागली, ती झोपेत असतानाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bihar Murder News: मेहुणीसाठी स्वतःच्या पत्नीचीच हत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. (Love Affair News) पत्नीचा अडथळा दूर करण्यासाठी पतीने हा भयंकर कट रचला होता. (Husband Killed Wife) पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. बिहार राज्यातील लखीसराय जिल्ह्यात ही घटना घडली आहे. (Wife Shot Dead By Husband)

पत्नी झोपेत असताना केली हत्या

पोलिसांनी अलीकडेच या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. अरमा गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची गोळी झाडून हत्या केली आहे. मेहुणीसोबत लग्न करण्यासाठी त्याने हा सगळा कट रचल्याचा प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. सुधा मुंगेर असं मयत महिलेचे नाव आहे. सुधा एएनएम या पदावर कार्यरत होती. सख्खी बहिण आणि पतीनेच सुधा यांचा विश्वासघात करत त्यांची हत्या केली आहे. इतकंच नव्हे तर, पत्नी झोपेत असताना आरोपीने तिची हत्या केली आहे. 

मेहुणीसोबत अनैतिक संबंध

राजेंद्र मंडळ असं आरोपीचे नाव असून त्याचे आणि त्याच्या मेहुणीसोबत अनैतिक संबंध होते. सुधा यांना त्यांच्या संबंधाबाबत कळताच त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळंच राजेंद्र आणि सुमन यांनी त्यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. पत्नी सुधा झोपलेल्या असताना आरोपीने त्यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर झोपेतच सुधा यांचा मृत्यू झाला. 

रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

राजेंद्र यांच्या घरात गोळ्या चालवल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर सुधा यांचा मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तेव्हा तिथे राजेंद्र, सुमन भारती आणि तिचा मुलगा सौरभ उपस्थित होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करताच त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. 

आरोपी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळं त्यांचा संशय अधिक बळावला. तसंच, त्यांना राजेंद्र आणि सुधाच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले. तिघांचीही कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. लग्न करण्यासाठी सुधावर गोळ्या झाडल्याची माहिती राजेंद्र याने पोलिसांना दिली.

पोलिसांकडून तिघांना अटक

राजेंद्र आणि सुधा यांनी मेहुणी सुमनचा मुलगा सौरभला दत्तक घेतले होते. राजेंद्रला त्याला सुधाच्या जागी नोकरीला लावायचे होते, असाही त्यांचा प्लान होता. राजेंद्र आणि सुधाला सौरभनेही मदत केली होती. त्यामुळं पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. 

Related posts