45 Bags With Human Body Parts Found In Mexico; ४५ पिशव्यांमध्ये सापडले मानवी अवयव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मेक्सिको सिटी: मेक्सिकोतील जलिस्को राज्याचे पोलीस गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या ७ तरुणांचा शोध घेत होते. या शोध मोहिमेदरम्यान त्यांना ४५ पिशव्या सापडल्या आहेत. यामध्ये मानवी शरीरांचे अवशेष आहेत. या सगळ्या पिशव्या एका खड्ड्यात सापडल्या.मानवी अवयवांनी भरलेल्या ४५ पिशव्या आढळून आल्याची माहिती जलिस्को पोलिसांनी दिली. खड्ड्यात सापडलेल्या पिशव्यांमध्ये पुरुष आणि महिलांच्या शरीरांचे अवयव आहेत. जलिस्कोतील ग्वाडलजारा भागातील जापोपन नगरपालिकेच्या हद्दीत ४० मीटर (१२० फूट) खोल खड्ड्यात ४५ पिशव्या सापडल्या आहेत. त्यामध्ये मानवी अवयव आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
पृथ्वीच्या पोटात तब्बल ३२ हजार फूट खोल खड्डा करतोय चीन; ड्रॅगनचा नेमका प्लान काय?
गेल्या आठवड्याभरापासून ७ जणांचा शोध सुरू होता. यामध्ये ३० वर्षांच्या दोन महिला आणि ५ पुरुषांचा समावेश होता. गेल्या महिन्याच्या २० तारखेपासून ७ जण बेपत्ता होते. ते बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या दिवशी मिळाल्या होत्या. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. बेपत्ता झालेले सातही जण एकाच कॉल सेंटरमध्ये कार्यरत असल्याची माहिती तपासातून उघडकीस आली.

ज्या परिसरात पोलिसांना मानवी अवयव सापडले, त्याच परिसरात बेपत्ता झालेले सात जण काम करत असलेलं कॉल सेंटर आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाला पाचारण केलं आहे. पीडितांची संख्या आणि त्यांची ओळख अद्याप तरी पटलेली नाही. कॉल सेंटरमध्ये अवैध कामं चालायची, अशी माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी रक्तानं माखलेले कपडे आणि गांजा सापडल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
पोटात अडकला ८ इंचांचा डिओ कॅन; तरुणाला वेदना असह्य, कण्हत कण्हत हॉस्पिटल गाठलं अन् मग…
काही वर्षांपूर्वीच पोलिसांना जलिस्कोच्या विविध भागांमध्ये मानवी अवयव सापडले आहेत. जलिस्कोमधील टोनाला नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत २०२१ मध्ये ११ पुरुषांचे अवयव ७० पिशव्यांमध्ये सापडले होते. त्याआधी २०१९ मध्ये जापोपन परिसरातील एका निर्जनस्थळी ११९ पिशव्यांमध्ये २९ जणांचे मृतदेह आढळून आले होते. जलिस्कोमध्ये २०१८ साली तीन विद्यार्थी बेपत्ता झाले होते. त्यांचे मृतदेह ऍसिड टाकून पेटवण्यात आले होते.

[ad_2]

Related posts