Sanjay Raut Critisiezed Statment Of DCM Devendra Fadnvis Over Eknath Shinde Will Not Disqualified Maharashtra Politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut on CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अपात्र होणार नाहीत, मात्र अपात्र झाले तरी शिंदे विधानपरिषदेचे आमदार होऊन मुख्यमंत्रीपदी कायम राहणार, असा दावा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीत बोलताना केला आहे. त्यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेत, अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एकनाथ शिंदेंना विधानपरिषदेवर घ्याल, पण त्यांच्या अपात्र आमदारांचे काय? असा प्रश्न संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. तसेच, शिंदे गटाचे 40 आमदार अपात्र होतील, असा दावा संजय राऊतांनी यावेळी बोलताना केला आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदेंना विधानपरिषदेवर घेणार हे वक्तव्य धिक्कार करण्यासारखं असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत दौंडमध्ये आहेत. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर आम्ही त्यांना विधानपरिषदेवर घेऊ आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकवू. शिंदे होतील विधानपरिषदेवर मुख्यमंत्री, पण त्यांचे 40 आमदार अपात्र ठरतील त्याचं काय? प्रत्येकाला तुम्ही विधानपरिषदेवर घेऊन देशात घटनाबाह्य पद्धतीनं तुम्ही राज्य करणार आहात का? देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य धिक्कार करण्यासारखं आहे.” 

शिंदे अपात्र ठरले, तरी विधानपरिषदेवर जाण्याचा पर्याय : देवेंद्र फडणवीस 

मी पुन्हा येईनच्या भाजप प्रदेश कार्यालयाच्या व्हिडीओमुळे राज्यात नेतृत्त्व बदलांच्या चर्चेला उधाण आलेलं. अशातच एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. एकनाथ शिंदे अपात्र ठरणार नाहीत, याचा आम्हाला विश्वास आहे. पण जरी ते अपात्र ठरले तरी विधानपरिषदेवर जाण्याचा पर्याय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी एकनाश शिंदेंच कायम राहणार असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. 

काय म्हणालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? 

“एकनाथ शिंदे डिस्कॉलीफाय होतच नाही. ते झाले तरी देखील विधानपरिषदेवर येऊ शकतात. पण आम्ही कायद्याने सर्वकाही केले आहे. आम्हाला कोणतीही भीती नाही. उद्धव ठाकरे हे उर्वरित पक्ष वाचवण्यासाठी ते लोकांना आशा दाखवत आहेत. हे सरकार पूर्णवेळ चालणार आहे. बी प्लानची गरज नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील.”, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

एकनाथ शिंदे अपात्र ठरणार नाहीत, मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील : कृपाल तुमाने (Krupal Tumane)

एकनाथ शिंदे अपात्र ठरणार नाहीत, ते मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील, असं वक्तव्य खासदार कृपाल तुमाने यांनी केलं आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकत नाही. ही प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्या विषयावर बोलणं उपयुक्त नाही. नियमाप्रमाणे सर्व काम शिंदेंनी योग्य पद्धतीनं केलेलं आहे. घटनेतील 10व्या सूचीचा सातत्यानं दाखला ते देतात, तो याठिकाणी लागू होत नाही. त्यामुळे अपात्रतेबाबत आमच्या मनात शंका नाही. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील, असं खासदार तुमाने म्हणाले आहेत. 

[ad_2]

Related posts