Maharashtra Politics NCP Sharad Pawar Group Leader Slams DCM For Devendra Fadanvis On Shivsena MLA Disqualification Case Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : ’40 जणांपैकी तुम्ही एकाच पुनर्वसन कराल. उर्वरित 39 जणांच काय होणार?’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस (Devendra Fadanvis) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अत्यंत सूचक वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं की, जरी शिंदे अपात्र ठरले तरी आम्ही त्यांना विधानपरिषेदवर निवडून आणू, त्यामुळे पुढच्या सहा महिन्यांसाठी तेच मुख्यंमंत्री राहतील. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर सध्या विरोधकांकडून चांगलाच समाचार घेतला जात असल्याचं पाहायला मिळतयं. 

आमदार अपात्रतेचा निर्णय हा सध्या विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिंदे आणि त्यांच्यासोबतचे 40 आमदार अपात्र होणार यावर शिक्कामोर्तब तर झालं नाही ना अशी शंका देखील सध्या उपस्थित केली जातेय. तर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यासोबत आलेल्या 39 आमदारांविषयी प्रश्न उपस्थित केलाय. 

जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेविषयी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते जर अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील; कारण त्यांना आम्ही विधानपरिषदेवर घेऊ. प्रश्न तिथेच संपतो का? त्यांच्यासोबत आलेल्या 40 जणांपैकी तुम्ही एकाच पुनर्वसन कराल. उर्वरित 39 जणांच काय होणार? ते तर गेले ना जिवानीशी, त्यांच राजकारणच संपलं. असं सूचित केलं जातंय, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी सवाल उपस्थित केले आहेत. 

शिंदे अपात्र ठरले, तरी विधानपरिषदेवर जाण्याचा पर्याय : देवेंद्र फडणवीस 

मी पुन्हा येईनच्या भाजप प्रदेश कार्यालयाच्या व्हिडीओमुळे राज्यात नेतृत्त्व बदलांच्या चर्चेला उधाण आलेलं. अशातच एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. एकनाथ शिंदे अपात्र ठरणार नाहीत, याचा आम्हाला विश्वास आहे. पण जरी ते अपात्र ठरले तरी विधानपरिषदेवर जाण्याचा पर्याय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी एकनाश शिंदेंच कायम राहणार असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा : 

Maharashtra Politics: फडणवीस म्हणातात, शिंदे अपात्र ठरले तर विधापरिषदेवर जाण्याचा पर्याय; संजय राऊत म्हणतात, पण, 40 आमदार अपात्र ठरतील त्यांचं काय?



[ad_2]

Related posts