Maratha Reservation Satara Mandhardevi Temple Banned To Political Leaders Manoj Jarange Protest Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सातारा : मराठा आंदोलनाची (Maratha Reservation) धग गावापासून आता मंदिरांपर्यंत पोहचल्याचं दिसून येतंय. साताऱ्यातील मांढरदेवी गडावर (Satara Mandhardevi Temple) आता राजकारण्यांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आता मांढरदेवी गडावरील काळूबाईचे दर्शन घेता येणार नाही. मंदिरा बरोबर गावात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाची धग आता राज्यभर पसरताना दिसत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकारण्यांना गावबंदी करा अशा सूचना मनोज जरांगे यांनी केल्यानंतर आता गावागावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात येत आहे. त्यातच आता ही बंदी मंदिरापर्यंतही पोहोचल्याचं दिसून येतंय. साताऱ्यातील मांढरदेवी गावात आता राजकारण्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच मांढरदेवी गडावरील काळूबाईचे दर्शनासही बंदी घालण्यात आली आहे.  मराठा समाजातील अंदोलकांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मांढरदेवी ग्रामपंचायतीनेही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

[ad_2]

Related posts