[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maratha Reservation Protestपाणी घ्या…पाणी घ्या…जरांगे साहेब पाणी घ्या,आंतरवालीत जोरदार घोषणाबाजी
आंतरवाली सराटी (जि. जालना) : मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी शेकडो लोकांनी हात जोडून प्रार्थना केली. यावेळी त्यांनी विनंती मान देताना पाणी घेण्याची विनंती मान्य केली. मात्र, सरकारला एखादा बळी द्यायचा असेल तर घेऊ द्या, जाणूनबुजून आपल्या समाजाच्या लेकरांवर अन्याय केला जात आहे. न्याय मिळवण्यासाठी, आरक्षण मिळवण्यासाठी एका जणाचा जीव गेला तरी चालतो पण न्याय मिळला पाहिजे, न्याय मिळण्याचा दिवस जवळ आला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी देताना त्यांचे डोळे पाणावले.
[ad_2]