[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Maratha reservation) आंदोलक आक्रमक झाले (ST Buses) आहेत. त्यांनी अनेक रस्त्यांवर जाळपोळ करायला सुरुवात केली आहे. विशेषतः मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड या भागातील आंदोलन चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातून जालना बीड लातूरकडे जाणाऱ्या बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलेला आहे.
आजपासून जालना बीड लातूरकडे जाणाऱ्या बस सेवा बंद केलेल्या आहेत. संभाजीनगरपर्यंत जाणाऱ्या बसेस सुरु आहे. मात्र त्यांनाही अहमदनगरला थांबावं लागत आहे. पोलीस प्रशासनाने एसटी महामंडळाला बसेस बंद करण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि एस टी महामंडळाने बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांचे हाल…
पुण्यातून बाहेर गावी जाण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. रोज हजारो प्रवासी पुण्यातून बाहेर गावात एसटीने प्रवास करत असतात. त्यात दिवाळीचे दिवस आहेत. त्यामुळे प्रवाशांची लगबग वाढली आहे. मात्र बस बंद असल्याने प्रवाशांना हाल सहन करावे लागणार आहे.
नाशिकहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बससेवा बंद
नाशिकहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बससेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार आज सकाळपासून मराठवाड्याकडे धावणाऱ्या बसेस फेऱ्या रद्द करण्यात आली असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम राज्यातील एसटी महामंडळाच्या बससेवांवर जाणवू लागला आहे. कालपासून मराठवाड्यातील एसटीच्या सगळ्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नाशिकमधूनही मराठवाड्याकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सकाळपासून एकही बस छत्रपती संभाजीनगर, जालनाच्या दिशेनं गेल्या नाहीत. तसेच मराठवाड्याकडून नाशिकला एकही बस मुक्कामी अली नसल्याचे एसटी महामंडळ वाहतूक नियंत्रकाकडून सांगण्यात आले आहे.
एसटी महामंडळाचे लाखोंचे नुकसान
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असून, याचे पडसाद पुण्यात देखील पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील असंख्य गावात राजकीय नेत्यांना गावबंदी तर उपोषण सुरु करण्यात येत आहेत. असं असताना राज्यातील काही भागात मात्र आंदोलनांचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पुण्यात अनेक ठिकाणी मराठ्यांचं साखळी आंदोलन सुरु आहे तसंच जिल्ह्यात वेगवेगळ्या गावात मराठे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाची बातमी-
Nashik Bus Service : मराठा आंदोलनाची धग, नाशिकहून मराठवाडयात जाणारी लालपरी थांबली, प्रवाशांचे हाल, सकाळपासून बस बंद!
[ad_2]