[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला (Sasoon Hospital Drug Racket) अंधेरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र यावेळी न्यायालयात बोलताना त्यांने पुणे पोलिसांसंदर्भात मोठा दावा केला. मला पुणे पोलिसांकडून धोका आहे. त्यांनी मला मारहाण केली होती. पुणे पोलिसांच्या मारहाणीमुळे बरगडी आणि कानामध्ये जखम झाली आहे, असं तो कोर्टात बोलला.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आज 13 दिवसानंतर पुन्हा रिमांडसाठी ललित पाटील याला न्यायालयात हजर केले. न्यायाधीश विजय गवई यांनी सरकारी वकील आणि आरोपीचे वकिल यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आज अखेरीस आरोपी ललित पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र इतर आरोपी असलेल्या हरीश पंत, अमीर आतिफ शेख यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज सकाळपासूनच पुणे पोलीस ललित पाटील याचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. आज ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.
ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांकडे मिळणं गरजेचं…
पुणे पोलिसांचा तपास हा ललित पाटीलच्या चौकशीपर्यंत येऊन थांबला आहे. आतापर्यंत ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी काहींना अटक केली आहे आणि त्यासोबतच ससूनचादेखील तपास सुरु आहे. मात्र हा तपास पुढे नेण्यासाठी ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळणं गरजेचं आहे.ललित पाटीलला कोण मदत करत होतं? या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा समावेश होता. या संदर्भातील सगळी माहिती पुढे येणं गरजेचं आहे. त्यामुळे ललित पाटीलचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहे.
रोज नवे खुलासे समोर
ललित पाटील याला ज्यावेळी साकिनाका पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळीदेखील त्याने मोठे खुलासे केले होता. मी ससूनमधून पळालो नाही मला पळवण्यात आलं आहे, असं तो म्हणाला होता. त्याच्या या दाव्यामुळो मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे पोलीस , येरवडा कारागृह प्रशासन आणि ससून व्यवस्थापक यांच्यावर संशयाची सुई वळली होती. मात्र त्यानंतर या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहे. ललित पाटील प्रकरणात त्याला मदत करण्याऱ्यांच्या संख्येत रोज भर पडत आहे.
इतर महत्वाची बातमी-
ससूनचे डीन ललित पाटीलवर मेहरबान असल्याचा आणखी एक पुरावा समोर, ललितला टीबी झाल्याचं ससूनच्या डीनचं पत्र एबीपी माझाच्या हाती
[ad_2]