Bhiwandi Thane Accident Four Years Old Girl Is Died In The Accident Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरात मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. तरीही शहरातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने मार्गक्रमण करत असतात. यामुळे मागील महिन्यात तब्बल तीन जणांचा अपघातात (Accident)  दुर्दैव मृत्यू झाला. त्यानंतर शहरात अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पण त्यानंतर भिवंडी शहरातील अवजड वाहनांची वाहतूक सुरुच होती. त्यातच पुन्हा एकदा अवजड वाहनांच्या  धडकेमध्ये एका चार वर्षाच्या चिमुरडीने आपला जीव गमावला. हबीबा अफसर खान असे मृत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.

शहरातील अवचित पाडा चाविंद्रा या ठिकाणी ती रस्ता ओलांडत असताना तिला कंटेनरने धडक दिली. या धडकेमध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यावेळी संतप्त नागरिकांनी रस्ता अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना बाजूला करुन रस्ता वाहतूकीसाठी मोकळा केला. सध्या या चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आलीये. 

भिवंडीत दुचाकीस्वाराचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी भिवंडीमध्ये एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले. सुभाष केशरी नायक असं 35 वर्षीय व्यक्तीचं नाव होतं. त्यानंतर या अपघाताची माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना देण्यात आली. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु यामधील सुभाष यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांकडून या अपघाताची चौकशी करण्यात आली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची भिवंडी तालुक्यात पोलिसांकडून या संदर्भात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

चेंबूर परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने तीन जणांना उडवलं

 चेंबूरच्या  डायमंड गार्डनजवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेनं आपल्या कारनं तीन जणांना उडवलंय. या धडकेत तीन जण गंभीर जखमी झालेत. मैत्री पार्कवरून चेंबूरच्या दिशेन भरधाव वेगात येत असताना हा सगळा प्रकार घडला. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला ही कुर्ल्याची रहिवासी असून व्यवसायाने आर्किटेक आहे. मध्यरात्री ती मद्यधुंद अवस्थेत  तिची मोटर कार चालवत मैत्री पार्कवरून चेंबूरच्या दिशेन भरधाव वेगात निघाली होती. महिला बेफामपणे गाडी चालवत होती. दरम्यान, कार  डायमंड गार्डनजवळ आली असता महिलेचा गाडीवरचा ताबा सुटला आणि दुचाकीवरून समोर स्कूटीवर असलेल्या  जैस्वल कुटुंबाला उडवले. हर्ष जैस्वाल,समृद्धी जैस्वाल, दिपू जैस्वाल यांना तिने जोरदार धडक दिली. यामध्ये हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळील झेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा : 

मुंबई वडोदरा महामार्गावरील दुर्घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू

[ad_2]

Related posts